Home | ब्रीदफ्री बद्दल | Cipla | मीडिआ कक्ष | साइन अप करा | डाऊनलोड | शोधा
  Breathe Free
हा खोकला आहे
की दमा?
उपचार आणि
नियंत्रण
दम्याविषयी आपल्या प्रश्नांना उत्तरे
ऍलर्जिक
राहिनाइटिस
सिओपीडी
 
मुलांचे ट्रिगर्स सामान्य प्रश्न मुलाच्या कथा मुलांचे इनहेलर्स
 

मुलांमध्ये दमा

Important Points to Remember

दम्याचे ट्रिगर्स (उद्दीपके) म्हणजे काय?

ट्रिगर्स (उद्दीपके) अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपल्या मुलास दम्याचा अॅूटॅक येऊ शकतो किंवा स्थिती बिघडू शकते.
ट्रिगर्स (उद्दीपके) सर्वत्र असतात. आपले घर, शाळा, मैदानात भरपूर ट्रिगर्स (उद्दीपके) असू शकतात.

आपल्या मुलासाठी काही सामान्य दम्याचे ट्रिगर्स (उद्दीपके) ही असू शकतात:
धूळ आणि धूर
झाडांकडून परागवहन
शाळेत खडूची धूळ
वातावरणात बदल
हसणे आणि रडणे यासारख्या तीव्र भावना
केसाळ प्राण्यांचे केस आणि पक्ष्यांची पीसं
शारिरीक श्रम आणि व्यायाम

आपल्या मुलाला केवळ एक ट्रिगर (उद्दीपक) असू शकते किंवा आपल्याला अनेक गोष्टी ट्रिगर्स (उद्दीपके) च्या रुपात सापडू शकतात. आपल्या मुलामधील कोणती गोष्ट दम्याला ट्रिगर (उद्दीपक) करते हे एकदा माहिती झाल्यानंतर, या ट्रिगर्स (उद्दीपके)वर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलणे महत्वाचे आहे. आपण आपल्या घरातून ट्रिगर (उद्दीपके) काढून टाकता किंवा बाहेर असलेल्या ट्रिगर्स (उद्दीपके)पासून आपल्या मुलाला दूर ठेवता, तेव्हा आपण आपल्या मुलाला निरोगी राहण्यासाठी आणि दम्याचे अॅकटॅक कमी येण्यासाठी मदत करता. आपल्या मुलाच्या दम्याचे ट्रिगर्स (उद्दीपके) ओळखण्यासाठी डॉक्टरांसह काम करा.

हा आपल्या मुलाचा ट्रिगर (उद्दीपक) असल्यास
हे आपण करू शकता
 
चादरी, ब्लँकेट्स, उशा, गाद्या, सॉफ्ट फर्निचर, कार्पेट्स आणि आपल्या मुलांच्या मऊ खेळण्यांमध्ये असलेली धूळ.


 
आठवड्यातून एकदा गरम पाण्यात बिछाना धुवा.
पूर्णपणे कोरडा करा.
उशा आणि चादरींवर धूळ विरहित कव्हर वापरा.
कार्पेट टाळा.
आपल्याला कार्पेट आवश्यक असल्यास, त्यांना दर आठवड्यात साफ करा आणि आपला मुलगा घरी नसताना घर झटका आणि स्वच्छ करा.
आपण धुवू शकता अशी मऊ खेळणी निवडा.
मऊ खेळणी गरम पाण्यात धुवा.
आपला मुलगा येण्यापूर्वी पूर्णपणे कोरडे करा
खेळण्यासह खेळण्यापूर्वी.

 
आपल्या घरात असलेले प्राणी जसे मांजर, कुत्री.




 
पाळीव प्राण्यांचे केस आणि धूळ नियंत्रित करण्यास मदतीसाठी प्रत्येक आठवड्यात साफ करा.
केसाळ प्राणी आणि पीस असलेले पक्षी एकाच ठिकाणी ठेवणे टाळा. त्यांना मुख्य राहण्याच्या आणि झोपण्याच्या जागेपासून दूर ठेवा.
आपल्याला पाळीव प्राणी पाळणे आवश्यक असल्यास, त्याऐवजी मासे ठेवा.
 

 
खाद्य पदार्थ





 
दमा असलेल्या बर्याोच लोकांना कडक पथ्य पाळले नाही तरी चालते. परंतु काही मुलांना शेंगदाणे, अंडी, गाईचे दूध, शेल मासा, कृत्रिम रंगांमुळे ऍलर्जी होऊ शकते...कृपया आपल्या मुलाच्या ट्रिगर (उद्दीपक)वर लक्ष ठेवा, ते शक्य तितके टाळा आणि डॉक्टरांना तसे कळवा.
 

 
व्यायाम











 
दम्यासाठी उत्कृष्ट व्यायाम म्हणजे योगासन आणि पोहोणे आणि स्प्रिंटिंग (थोडे जलद चालणे) हे खेळ आहेत, कारण यात सतत पळण्याची गरज नसते. काही दमा रुग्णांना व्यायाम करण्यापूर्वी एखाद्या रिलीव्हर(आराम देणारे औषध)/ रेस्क्युअर चा वापर केल्याने लाभ होतो.
आपला मुलगा एखादा विशिष्ट खेळ खेळण्यापूर्वी त्याच्या किंवा तिच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आपल्या मुलाला तात्काळ त्रास झाल्यास त्याला शांत राहण्यास आणि तातडीने शिक्षकांना सूचित करण्यास सांगा.
नेहमी आपल्या मुलाच्या किटमध्ये अतिरिक्त पॅकसह रिलीव्हर (आराम देणारे औषध) हाती ठेवा, आणि शाळेस आपल्या टेलिफोन नंबरसह लेखी तात्काळ सूचना द्या.
 

 
झुरळ

 
काउंटर, सिंक, टेबल आणि जमीन स्वच्छ आणि कचरा विरहित ठेवा.
सिंकमध्ये रात्रभर घाणेरड्या डिशेस तशाच पडू देऊ नका.
हवाबंद डब्यांमध्ये खाद्य पदार्थ साठवा.
कचर्या्चे डबे झाकून ठेवा.
 

 
स्वयंपाकघर, बाथरुम आणि तळघर अशा ओलसर जागेत वाढणारी बुरशी.





 
आपण खडबडीत जमीनीवर बुरशी किंवा भूछत्र दिसल्यास, तिथे साबण आणि पाण्याने स्वच्छ करा. परीसर पूर्णपणे कोरडा करा.
आंघोळ करताना, स्वयंपाक करताना किंवा डिशेस धूताना एक्झॉस्ट फॅन वापरा किंवा बाथरुम आणि स्वयंपाक घरातील खिडकी उघडा.
पाणी गळणे शक्य तितक्या लवकर बंद करा
यामुळे बुरशी वाढणे थांबेल.
ओलसर किंवा ओल्या वस्तू पूर्णपणे कोरड्या करा
म्हणजे बुरशी वाढणार नाही.
 

 
धुम्रपान आणि बाहेरचे वायू प्रदूषण

















 
आपल्या मुलाजवळ किंवा आपल्या घरात धुम्रपान करू नका किंवा कोणालाही धुम्रपान करण्याची परवानगी देऊ नका.
कुटुंबातल्या सदस्यांना बाहेर धुम्रपान करण्याची विनंती करा, धूर पडद्यावर, सोफा आणि कार्पेटवर बराच वेळ राहून आणि यामुळे आपल्या मुलाला मोठा ट्रिगर (उद्दीपक) होऊ शकतो म्हणूनच.
हवा चांगली असताना आपल्या मुलाला बाहेर खेळू द्या.
बराच वेळ धावावे लागते अशा बाह्य खेळांवर बंधन घाला.
आपल्या मुलाच्या चेतावणी देणार्या लक्षणांकडे लक्ष द्या. आपल्याला लक्षणं दिसू लागल्यास, आउटडोअर क्रियांवर मर्यादा घाला. आपल्या मुलाच्या डॉक्टरांशी याविषयी निश्चितपणे बोला.
आपल्या मुलाचा दमा आपण विशिष्ट उत्पादन वापरल्यास आणखी बिघडत असल्याचे आपल्याला आढळल्यास, दुसरी उत्पादने वापरून पाहा. आपल्या मुलाला उत्पादनातल्या रसायनांची ऍलर्जी होऊ शकते. अध्ययनातून दिसून आले आहे की एक मच्छर उदबत्ती (मॉस्क्विटो कॉईल) मुळे आपला मुलगा 75 ते 137 सिगारेटच्या बरोबरच वायू प्रदूषणाच्या संपर्कात येतो.
 

 
रासायनिक इरिटन्ट्स (उत्तेजक पदार्थ) क्लीनर, रंग, ऍढेसीव्ह, कीटकनाशके, सौंदर्य प्रसाधने, मॉस्क्विटो कॉईल्स किंवा एअर फ्रेशनर यासह.


 
आपण एखादे उत्पादन वापरत असल्यास, आपला मुलगा तिथे नसल्याची खात्री करा.
खिडक्या किंवा दरवाजे उघडा, किंवा ऍक्झॉस्ट फॅन वापरा.
लेबलवर असलेल्या सूचना पाळण्याचे नेहमी लक्षात ठेवा.
 


कृपया लक्षात घ्या: ही ट्रिगर्स (उद्दीपके)ची संपूर्ण यादी नाही. आपल्या मुलाला दमा असल्यास, आपल्याला आपल्या मुलाच्या ट्रिगर(उद्दीपक)वर लक्ष ठेवावे लागेल आणि आपल्या मुलाला त्यांच्याशी संपर्क ठाळण्यासाठी तसे सांगावे लागेल. आपल्याला आपल्या मुलाच्या ट्रिगर्स (उद्दीपके), लक्षणं आणि उपचाराविषयी काही शंका असल्यास नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.



  ©2010 ब्रीद फ्री (Breathe Free), सर्व अधिकार राखीव.