अस्थमा

अस्थमाविषयी

अस्थमा ही अशी स्थिती आहे ज्यामुळे भीती आणि चिंता निर्माण होते, खरं तर त्याबद्दल काळजी करण्यासारखे काही नाही. साध्या शब्दात सांगायचे तर, अस्थमा ही श्वसनाची समस्या आहे जिचा फुफ्फुसांमधील वायूमार्गांवर परिणाम होतो. नक्की काय घडते तर वायूमार्ग काही वेळेस ठराविक पदार्थांना प्रतिक्रिया निर्माण करतात त्यामुळे त्याच्या सभोवतालचे स्नायू गच्च होतात, त्यामुळे वायूमार्ग अरूंद होतात आणि श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे वायूमार्गाच्या लाइनिंगमधून अधिक म्युकस देखील स्त्रवण्यास कारणीभूत ठरते, ज्यामुळे वायूमार्ग अधिक अरूंद बनतात. ह्या सर्व गोष्टी भीतीदायक वाटतात, परंतु ही काही फार मोठी गोष्ट नाही.

‘‘स्वतःला सामान्य सक्रिय जीवन जगण्यापासून वंचित ठेवण्याची काहीही गरज नाही.’’

तेव्हा अस्थमा सतत असतो किंवा तो येतो आणि जातो? हंगामी अस्थमा नावाची एक स्थिती असते, ज्यात तुमच्या लक्षणांची स्थिती एखाद्या ठराविक हंगामात अधिक खराब होते, आणि दुसर्या हंगामात दिसून येण्याची शक्यता आहे. ह्यामुळे गैरसमज निर्माण होतो की अस्थमा ही अशी स्थिती आहे जी येते आणि जाते आणि त्यासाठी कोणतेही खास कारण नसते. परंतु, अस्थमा तुमच्याबरोबर दीर्घकाळ राहतो. परंतु एकदा तुम्हाला अस्थमाविषयी अधिक माहिती मिळाली की अस्थमाचे व्यवस्थापन करणे आणि अंदाज लावणे आणि अस्थमाचा झटका टाळणे कठिण नसते.

प्रत्येक व्यक्तीचा अस्थमा हा दुसर्या व्यक्तीच्या अस्थमापेक्षा वेगळा असतो. तुम्ही एक सर्वाधिक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणज तुमच्यासारख्या अनेक व्यक्ती आहेत, ज्या अस्थमाचे यशस्वी व्यवस्थापन करत आहेत. जागतिक आरोग्य संस्थेच्या असे निदर्शनास आले आहे की, संपूर्ण जगात सुमारे ३०० दशलक्ष लोकांना अस्थमाचा त्रास आहे, त्यापैकी २५ ते ३० दशलक्ष व्यक्ती भारतात आहेत. तेव्हा ही सामायिक स्थिती आहे आणि तुम्ही नक्कीच एकटे नाहीत.

व्हिडिओः डॉ. कुमार आईस्क्रिम त्याचे अस्थमावर होणारे परिणाम ह्याविषयी माहिती देतात

दुर्दैवाने अस्थमा बरा करण्यासाठी कोणतेही उपाय नसले तरी आधुनिक औषधांमुळे लक्षणांवर संपूर्ण नियंत्रण ठेवणे शक्य आहे, तेव्हा तुम्हाला अस्थमा आहे हे तुम्ही अगदी विसरून जाता. तेव्हा केवळ तुम्हाला अस्थमा आहे म्हणून स्वतःला सामान्य सक्रिय जीवन जगण्यापासून वंचित ठेवण्याची काहीही गरज नाही. फिल्म उद्योगात, औद्योगिक विश्वात आणि अगदी क्रीडाक्षेत्रात देखील अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत, ज्यांना अस्थमा आहे परंतु त्यामुळे त्यांना परिपूर्ण जीवन जगण्यापासून थांबवू शकले नाही.

अस्थमाचे ट्रीगर्स

ट्रीगर्स म्हणजे काहीही असू शकते - धुळीच्या कणांपासून ते डिओडोरन्टस - ज्यामुळे वायूमार्गांचा क्षोभ होतो, ज्यामुळे अस्थमाच्या लक्षणांमध्ये वाढ होते आणि अस्थमाचा झटका येतो. नेहमीच्या प्रसिद्ध समजुतीच्या अगदी विरूद्ध, अस्थमाचा झटका केव्हा येऊ शकतो, खासकरून तुम्हाला जर ट्रीगर्स ओळखता आले तर त्याचा अंदाज लावता येणे शक्य हो. परंतु, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की प्रत्येकाचा अस्थमा वेगळा असतो, आणि त्यामुळे त्यांचे ट्रगर्स देखील वेगळे असतात. तुमच्या अस्थमाच्या ट्रगर्सची माहिती करून घेतल्यास, तुम्हाला तुमच्या अस्थमाच्या झटक्याचा अंदाज लावणे आणि त्यास प्रतिबंध करणे अस्थमा नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

कधीकधी ट्रगर्स निश्चित करणे सोपे असते तर कधीकधी नसते. परंतु, तुमचे ट्रगर्स कोणते आहेत हे निश्चित करण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला मदत करू शकतील आणि तुम्ही ते टाळण्यासाठी तुमचे संपूर्ण प्रयत्न करू शकता.

अस्थमाचे काही सर्वाधिक सामायिक ट्रगर्स आहेत

धुळीचे कण - गादी, पडदे आणि सॉफ्ट टॉइजवर असणारे धुळीचे कण

पोलन - फुलांच्या रोपांमधून अनेक वेळा पोलन सोडले जातात जे काही लोकांसाठी ट्रगर्स असू शकतात.

सिगरेटचा धूर आणि हवा प्रदुषण - फटाक्यांचा धूर, एक्झॉस्टमधील धूर आणि सिगरेटरचा धूर यामुळे अस्थमाच्या झटक्याचा ट्रीगर येऊ शकतो.

पाळीव प्राणी - प्राण्यांचे केस, पिसे, लाळ आणि लोकर हे अस्थमाचे ट्रगर्स असू शकतात.

व्यावसायिक ट्रगर्स - छपाईचा कारखाना, रंगाचा कारखाना, दागिने बनविणे, दगडाची खाण, वगैरे सारख्या उद्योगात काम करणे हे तुमच्या अस्थमाचे कारण असू शकते.

सर्दी आणि विषाणू - स्वतःला निरोगी ठेवल्यास अस्थमाचा झटका येणे दूर ठेवण्यास मदत हो.

औषधोपचार - काही औषधोपचारांमुळे तुमच्या शरीरावर वाईट प्रतिक्रिया होऊ कत. तेव्हा, तुमच्या डॉक्टरांना तुमच्या सर्व औषधोपचारांची माहिती द्या.

व्यायाम - व्यायाम हा स्वतःला फिट ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे. परंतु, काही लोकांना शारीरिक कामामुळे देखील अस्थमाचा झटका येऊ शकतो.

अन्न - अस्थमा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला काटेकोर डाएट पाळावे लागत नाही, परंतु, काहींना ठराविक पदार्थांची अॅलर्जी असू शकते जसे की दूध, फेस येणारे पेय आणि नट.

हवामान - तापमानात अचानक बदल होणे हे अस्थमासाठीचे देखील ट्रीगर होऊ शकते.

मोल्डस आणि फंगी -ओल्या भींती, कुजलेली पाने आणि फंगी यांच्याशी आलेला संपर्क हे अस्थमाचे ट्रगर्स म्हणून ओळखले जातात.

तीव्र भावना - तणावामुळे तुमचे शरीर फाईट (हल्याच्या) स्थितीत जाते आणि त्यामुळे अस्थमाचा ट्रगर म्हणून काम करते.

हार्मोन्स - महिलांमध्ये हार्मोन्स अस्थमाचे ट्रगर्स असू शकतात. काहींना वयात येणे, त्यांची मासिक पाळी आणि गर्भावस्था यापुर्वी अस्थमाच्या झटक्याच्या अनुभव येऊ शकतो.

डासांच्या कॉइल्स, रूम फ्रेशनर्स आणि स्वच्छता उत्पादने - ह्या उत्पादनांमध्ये वापरलेल्या रसायनांमुळे तुमच्या वायूमार्गांचा क्षोभ होणे आणि अस्थमाच्या झटक्याचे ट्रीगर येणे म्हणून काम करते.

Please Select Your Preferred Language