धाप लागणे

धाप लागणे म्हणजे काय?

१० पायऱ्या चढल्यानंतर असो किंवा खासकरून खडतर व्यायाम केल्यानंतर असो, आपण सर्वांनी कधीतरी धाप लागल्याचा अनुभव घेतलेला असतो. तुम्हाला जेव्हा श्वास घेण्या त्रास होतो तेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटते. तुम्ही स्वतः खूप-जास्त मेहनत घेतली असेल तर धाप लागणे अगदी सामान्य स्वरूपाचे असते. अशा वेळी तुमच्या शरीराला अधिक ऑक्सिजन देण्यासाठी तुमचा श्वासोच्छवास जोराजोरात होत असतो. परंतु, अगदी सर्वसाधारण कामे करत असताना देखील तुम्हाला स्वतःला धाप लागल्यासारखे वाट असेल तर अशा वेळी डॉक्टरांना भेटण्याची गरज असते.

धाप लागणे ही आतील खोलवर समस्येची लक्षणे आहेत, जसे की अस्थमा, जुनाट अडथळा निर्माण करणारा फुफ्फुसांचा आजार (सीओपीडी), इतर आजारांबरोबरच अॅनिमिया आणि चिंता. अचूक निदान आणि योग्य उपचारांद्वारे, तथापि, ह्या सर्व समस्यांवर सहज नियंत्रण ठेवता येते आणि त्यांचे व्यवस्थापन करता येते.

तुम्हाला अचानक खुप धाप लागल्यासारखे वाटत असेल तर काय करावे

) घाबरून जाऊ नका, कारण त्यामुळे फक्त धाप लागण्याची स्थिती अधिक खराब होऊ शकते.

) धाप लागण्याचे काही खास कारण नसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा रूग्णालयात जा.

) तुम्हाला अस्थमा असल्याचे ज्ञात असल्यास, तुमच्या डॉक्टरांनी समजावून सांगितल्याप्रमाणे तुमच्या रिलिवर इन्हेलरचा उपयोग करा.

Please Select Your Preferred Language