अस्थमा

दम्याची लक्षणे

अस्थमाची लक्षणे ओळखणे खूप सोपे असते. अस्थमाची सामान्य लक्षणे अशी आहेतः

धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे: तुमच्या फुफ्फुसांमधील पुरेशी हवा आत बाहेर होत नाही असे तुम्हाला वाटते, आणि खासकरून श्वास बाहेर सोडताना त्रास होतो.

वारंवार किंवा सतत खोकला येणे: तुम्हाला अनेक दिवस जाणारा खोकला होतो आणि तुम्हाला असे लक्षात येते की तुम्हाला अनेकदा रात्री किंवा व्यायाम केल्यानंतर खोकला येतो.

श्वासाची घरघर: तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा श्वास बाहेर सोडता तेव्हा तुम्हाला शिटी वाजल्यासारखा आवाज येतो.

छातीत गच्च होणेः तुम्हाला छातीत गच्च झाल्यासारखे वाटते, जणू काही कोणीतरी तुमची छाती दाबत आहे किंवा छातीवर कोणीतरी बसले आहे असे वाटते.

अस्थमा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ही सर्व लक्षणे होतील असे आवश्यक नाही. उदाहरणार्थ, काही व्यक्तींना खूप खोकला येण्यामुळे रात्री नीट झोप लागत नसेल, तर काही व्यक्तींना व्यायाम करताना धाप लागण्याचा अनुभव येत असेल. तुम्ही लक्षणांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना तुमच्या स्थितीचे अचूक निदान करण्यास मदत करू शकता.
 

Please Select Your Preferred Language