प्रेरणा

जीवन २.०

ही आहे गोष्ट तारूण्याची - धमाल आनंद उपभोगण्याची आणि वेगळ्या प्रकारचा अनुभव घेण्याची. आपले नंतर काय होणार आहे म्हणजे समजा २० किंवा २५ वर्षांनंतर काय होईल याचा आपण विचार देखील करत नाही. याच ठिकाणी समस्येला खरं तर सुरूवात होते. मी जेव्हा तरूण होतो तेव्हा मी धूम्रपान करत होतो, त्यावेळी माझ्या आयुष्यावर त्याचा काय वाईट परिणाम होईल हे मला माहित नव्हते. मी अनेक वेळा धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी मीच मला कारण देत होतो, ‘मी एक स्वच्छंदी तरूण आहे आणि मी धूम्रपान करतो. फार फार तर काय वाईट होऊ शकते?’

याचे उत्तर फक्त चार अक्षरात आहे - सीओपीडी

सुरूवातीला लक्षणे फार सौम्य होती, त्याकडे मी दुर्लक्ष करू शकत होतो, म्हणजे थोडी धाप लागणे किंवा सारखा खोकला येणे. सुरूवातीला मला वाटले की ही वाढत्या वयाची लक्षणे आहेत, आणि त्याचा मी फार विचार केला नाही. परंतु कालांतराने माझी स्थिती खराब होत गेली. अगदी साधीसाधी कामे करताना, म्हणजे किराणा खरेदी किंवा वॉशरूमला जाणे अशी कामे करताना देखील मला दम लागत होता. नंतर परिस्थिती इतकी वाईट झाली की मला वॉशरूमला एकटे जाण्याची देखील भीती वाटू लागली आणि त्यानंतर माझ्या लक्षात आहे की मी अंथरूणावर झोपून होतो.

काही वेगवेगळ्या उपचारांचा उपयोग केल्यानंतर, पण त्यांचा फारसा उपयोग झाला नाही, मला माहित आहे की माझ्या स्थितीसाठी मला काही तरी वेगळे करावे लागणार होते. मी डॉक्टरांची भेट घेईपर्यंत मला सीओपीडी आहे हे मला कळलेच नाही.  पहिल्या वेळी जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितले तेव्हा मला वाटले की ते खोटं सांगत आहेत. जेव्हा मी तसे त्यांना म्हणालो तेव्हा धूम्रपानाचा माझ्या फुफ्फुसांवर आणि वायूमार्गांवर कसा परिणाम झाला आहे आणि मला शेवटी सीओपीडी कसा झाला हे त्यांनी मला समजावून सांगितले.

माझ्या लक्षात आले की ही माझ्यासाठी शेवटची संधी आहे. नंतर डॉक्टरांनी सांगितले की मी जर योग्य प्रकारचे उपचार घेतले आणि जीवनशैलीत काही बदल केले तर सीओपीडीचे व्यवस्थापन करता येईल. मी धूम्रपान सोडले आणि योग्य प्रकारचे उपचार घेतले त्यामुळे माझे डॉक्टर सांगतात की मी सीओपीडी वर नियंत्रण ठेवण्याच्या आता योग्य मार्गावर आहे.

मला आता कुठेही एकटे जाण्याची आणि काहीही खाण्याची भीती वाटत नाही. मला आशा आहे की सीओपीडी असलेल्या माझ्यासारख्या लोकांच्या हे लक्षात येईल की अजूनही सर्व काही संपलेले नाही आणि योग्य निदान, उपचार आणि जीवनशैलीत बदल केल्यास, तुम्ही निरोगी आणि सक्रिय जीवन जगू शकता.

Please Select Your Preferred Language