प्रेरणा

परमेश्वर तुमचे भले करो!

फक्त एक शिंक आली आणि याची सुरूवात झाली. अर्थात, एक शिंक माझे आयुष्य बदलू शकत नव्हती. पण ओळीने १५-२० मिनिटे शिंका आल्यास त्यामुळे बदलू शकते. आणि तुम्ही दमून जाईपर्यंत जर शिंका येत राहिल्या तर तुमचे आयुष्य पुन्हा नेहमीसारखे राहणार नाही.

सुरूवातीला मला वाटते की ती फक्त साधी सर्दी आहे. पण नंतर, शिंकांचा झटका पूर्ण दिवसभर रहात असे. सुरूवातीला माझ्या मित्रांनी आणि कुटुंबियांनी मला गमतीने अपशकुनांचा दूत म्हणून हाक मारण्यास सुरूवात केली आणि त्याला उत्तर म्हणून मी शिंका देत असे. काही दिवस मी देखील त्याला हसत असे.

पण नंतर, त्यातील मजा निघून गेली. त्यातला भ्रम निघून गेला आणि माझ्या शिंका देखील खूपच वारंवार येऊ लागल्या. प्रत्येक वेळी अपशकुनासारखे शब्द मला दुःख देत होते. आणि सतत शिंका येण्यामुळे माझ्या छातीत दुखण्यापेक्षा देखील मला त्याचा जास्त त्रास होऊ लागला.

मला माहित नव्हते की शिंकांचा देखील आजार असू शकतो.  माझे नाक सतत वाहत असे आणि डोळ्यातून पाणी येत असे. शेवटी मी डॉक्टरांकडे गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितले की माझ्या स्थितीला अॅलर्जिक र्‍हनिटस म्हणतात. सर्वप्रथम माझ्या डोळ्यासमोर अंधारच आला. मी उपचार आणि औषधे घेण्यास सुरूवात केली. माझे जीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले. आणि आज माझा अॅलर्जिक र्‍हनिटस पूर्णपणे नियंत्रणात आहे.

माझा नशिबावर,  खास करून अपशकून वगैरेसारख्या गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता. पण माझे नशिब चांगले होते की माझ्या डॉक्टरांनी मला माझ्या स्थितीचे योग्य निदान करण्यासाठी खूप मदत केली.  मला आशा आहे की माझ्यासारखी स्थिती असलेल्या इतरांना देखील मदत होईल. आणि माझ्याच प्रमाणे, त्यांचे देखील जीवन नेहमीसारखे होईल, त्यामुळे शिंकांऐवजी देखील त्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसेल.

Please Select Your Preferred Language