अस्थमा

बालकांमधील अस्थमा वेगळा कसा असतो?

जेव्हा एखाद्या बालाकाला अस्थमा होतो तेव्हा पालकांसमोर अनेक प्रकारचे प्रश्न उभे राहतात - आमच्याच बाळाला का? माझ्या बाळाची सामान्य पद्धतीने वाढ होईल का? माझे बाळ त्याचे सर्व आवडते खेळ खेळू शकेल का?

परंतु, अस्थमाविषयी चिंता करण्याची गरज नाही. ही समस्या, लक्षणे, ट्रायगर्स आणि उपचार या गोष्टींची तपशिलवार माहिती करून घेतल्यास, तुमच्या बाळाचा अस्थमा नियंत्रणात ठेवणे अतिशय सोपे आहे त्यामुळे तुमचे बाळ निरोगी आणि सामान्य जीवन जगू शकेल.

जागतिक आरोग्य संस्थेनुसार (डब्ल्यूएचओ) संपूर्ण जगात लहान मुलांमध्ये अस्थमा ही श्वसनाची सर्वाधिक सामायिक समस्या आहे. लाखो बालकांना अस्थमा आहे आणि ते त्याचे उत्तम व्यवस्थापन करतात. तेव्हा तुम्ही काही एकटे नाहीत.

लोकांच्या प्रसिद्ध समजानुसार, लहान मुलांमधील अस्थमा मोठ्या माणसांच्या अस्थमासारखा नसतो. प्रौढ व्यक्तींमध्ये धाप लागणे, शिटी वाजणे, खोकला आणि छाती गच्च होणे यासारखी लक्षणे दिसून येतात तर बालकांमध्ये तशाच प्रकारची लक्षणे न दिसण्याची शक्यता आहे. बहुतेक अस्थमाच्या बालकांना खोकला हे प्रमुख लक्षण असते. सतत खोकला येणे (जो ३-४ आठवड्यांपेक्षा अधिक काळ राहतो) हा लहान मुलांमध्ये अस्थमा असल्याचा निर्देशक असू शकतो.

हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, योग्य उपचार आणि व्यवस्थापनाद्वारे अस्थमावर संपूर्ण नियंत्रण ठेवणे शक्य असते, ज्याचा अर्थ तुमच्या बाळाला त्याला हवे ते सर्वकाही करता येईल.

 

अस्थमावर संपूर्ण उपचार करता येतात तेव्हा तुम्ही तुमच्या बाळाचा अस्थमा आणि त्याची वाढ ह्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. (इन्हेलर्स) हे अस्थमावर उपचार करण्याची सर्वाधिक प्रभावी पद्धती आहे.  इन्हेलरमधून औषधोपचार दिले जातात, त्यामुळे ते थेट फुफ्फुसांमध्ये पोहोचते आणि त्यामुळे कमीत कमी दुष्परिणाम होतात. अस्थमाच्या औषधोपचारांचे दोन प्रकार आहेत - (नियंत्रक (कंट्रोलर्स) आणि आराम देणारी(रिलिवर्स)). नियंत्रक औषधांचा उपयोग कालांतराने लक्षणांना आणि अॅटॅक्सना प्रतिबंध करण्यासाठी केला जातो. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की नियंत्रक औषधांमुळे तात्काळ आराम मिळत नाही. रिलिवर्समुळे तात्काळ आराम मिळतो आणि त्यांचा अस्थमाचा झटका आल्यास उपयोग केला जातो. कंट्रोलर्सचा नियमित उपयोग केल्यास त्यामुळे रिलिवर औषधांचा उपयोग करण्याची गरज कमी होण्यास मदत होऊ शकते.

तुमच्या बाळाला अस्थमा असल्यास तुम्ही काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहेः

  • तुमच्या बाळाच्या अस्थमाचे ट्रायगर्स निश्चित करा आणि ते टाळा

  • तुमच्या बाळाच्या लक्षणांवर कसे नियंत्रण ठेवायचे यासाठी तुमच्या बाळाच्या पेडिअॅट्रिशिअनचा सल्ला घ्या.

  • तुमच्या बाळासाठी तयार करण्यात आलेल्या अस्थमा कृतीयोजनेचे पालन करा.

  • इन्हेलर्सचा आणि इतर औषधांचा योग्य पद्धतीने उपयोग कसा करायचा हे शिकून घ्या आणि तुमच्या बाळाला शिकवा.

  • कंट्रोलर आणि रिलिवर इन्हेलर्सला लेबल लावा त्यामुळे त्यात कोणताही संभ्रम नसेल.

  • तुमचे बाळ शाळा, बगिचा आणि इतर सहलीसाठी कोठेली गेले तरी त्याच्या/तिच्यापाशी त्याचे रिलिवर इन्हेलर्स कायम बरोबर असेल  याची काळजी घ्या.

  • तुमच्या बाळाला अगदी सोप्या भाषेत अस्थमाची माहिती द्या, त्यामुळे त्याला/तिला ती समजेलर. त्याला/तिला इन्हेलरचा कसा उपयोग होतो आणि तो/ती अस्थमासंबंधी आणीबाणीची परिस्थिती कशी टाळू शकतात हे तुम्ही समजावून सांगितल्यास त्याला/तिला त्याचा फायदा होईल. 

  • अस्थमाचा झटका आल्यास सर्वप्रथम तुम्ही शांत रहावे आणि सर्व काही ठिक होणार आहे याची तुमच्या बाळाला खात्री द्या. असे करत असताना, तुमच्या बाळाला झटका आला असताना मदत व्हावी यासाठी अस्थमाच्या आणीबाणीच्या प्रसंगासाठी असलेल्या सूचनांचे पालन करा.

  • कुटुंबीय, काळजी घेणारी व्यक्ती आणि शाळेला तुमच्या बाळाला अस्थमा असल्याची माहती द्या, त्यांना अस्थमा कृती योजनेची माहिती द्या आणि त्यांना तुमची आप्त्कालिन संपर्काची माहिती देण्यास विसरू नका.

  • अशा प्रसंगी करण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमच्या बाळाचे बालपण हिरावून घेऊ नका. तुमच्या बाळाला नाचायचे असेल, खेळायचे असेल, पोहोणे किंवा मार्शल आर्ट खेळायचे असेल तर त्याला/तिला ते करू द्या. तुमच्या बाळाला अस्थमा आहे म्हणून केवळ त्यांना धमाल बालपणाचा आनंद घेता येणार नाही असे नाही. 

Please Select Your Preferred Language