ऍलर्जीक राहिनाइटिस

लक्षणे

साधारणपणे तुमचा जेव्हा अॅलर्जेनशी संपर्क येतो तेव्हा अॅलर्जिक र्हीनिटसची लक्षणे होतात आणि ती अगदी सहजपणे ओळखता येणारी असतात. काही प्राथमिक लक्षणांमध्ये यांचा समावेश आहे

  • वारंवार शिंका येणे, खासकरून सकाळच्या लवकरच्या वेळ

  • नाक वाहणे आणि पातळ, स्पष्ट दिसणारा नाकातील द्रव घशात उतरणे ज्यामुळे सा खवखवणे असे होते

  • डोळ्यातून पाणी येणे आणि खाज येणे

  • कान, नाक घशात खाज येणे

 

नंतर विकसित होणाऱ्या लक्षणांमध्ये यांचा समावेश होतोः

  • नाक चोंदणे

  • डोकेदुखी

  • थकवा आणि चिडचिड होणे

  • कान बंद होणे

  • वास येण्याची संवेदना कमी होणे

कालांतराने, तुमच्यावर अॅलर्जेन्सचा कमी परिणाम होतो, आणि तुमच्या लक्षणांची तीव्रता पूर्वीपेक्षा कमी होते.

 

अॅलर्जिक र्हीनिटस विरूद्ध सामान्य सर्दी

अॅलर्जिक र्हीनिटसच्या लक्षणांना अगदी सहज सामान्य सर्दीची लक्षणे आहेत असा गैरसमज होऊ शकतो. परंतु, लक्षणांमध्ये काही ठराविक फरक असतो ज्यामुळे तुम्हाला त्या दोन्हीत फरक करण्यात मदत होते.

अॅलर्जिक र्हीनिटस

सामान्य सर्दी

अॅलर्जेन्समुळे होते.

जंतूंमुळे होते.

तुम्हाला साधारणपणे ताप येणे किंवा अंगदुखी होणे असे होत नाही.

तुम्हाला ताप येणे आणि अंगदुखी होणे असे होते.

तुमच्या नाकातील म्युकस स्पष्ट आणि पाण्यासारखा असतो.

तुमच्या नाकातील म्युकस पिवळसर किंवा हिरवा आणि घट्ट असतो.

तुम्हाला खूप वेळा शिंका येतात, शिंकांच्या अगोदर झटका थांबतो.

शिंका वारंवार येत नाहीत आणि साधारणपणे एका वेळी थोडया प्रमाणात मर्यादित येतात.

डोळ्यातून खूप पाणी येते.

डोळ्यातून पाणी येत नाही.

काही दिवसांपेक्षा अधिक काळ लक्षणे कायम राहतात.

काही दिवसांत लक्षणे निघून जातात.

 

तुम्हाला अॅलर्जिक र्हीनिटसची ोणतीही/सर्व लक्षणे आहेत असे तुम्हाला वाटल्यास, तुम्ही योग्य निदान आणि उपचारांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. अॅलर्जिक र्हीनिटसवर वेळेवर उपचार करणे महत्त्वाचे असते, कारण त्यामुळे किचकट समस्या होऊ शकतात, जसे की अस्थमा, कानाचा संसर्ग आणि सायनसायटिस.

उजव्या हाताच्या बाजूचे बॅनर्स

उजव्या हाताच्या बाजूचा बॅनर # - पुष्पेन्द्र सिंग यांनी त्यांच्या अॅलर्जिक र्हीनिटसवर मात केली आणि आता ते उत्तम जीवन जगत आहेत. (प्रेरणादायी गोष्ट)

उजव्या हाताच्या बाजूचा बॅनर # - अॅलर्जी असलेल्या प्रत्येकाला अॅलर्जिक र्हीनिटस असतो का? (वारंवार विचारले जाणारे प्रश्न).

उजव्या हाताच्या बाजूचा बॅनर - ज्यांनी आपल्या श्वसनाच्या समस्यांवर यशस्वीरित्या मात केली आहे अशा लोकांशी संपर्क साधण्यासाठी कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा (ब्रीदफ्री कम्युनिटी).

 

Please Select Your Preferred Language