प्रेरणा

स्टार्सचे शुटिंग

झहान शांत बसणारा नव्हता. लहान मोठ्या ईजा होणे ही त्याच्या घरातली नित्याचीच बाब होती.  तरी सुद्धा त्याला काय हवे ते करण्यास कोणीही मनाई केली नाही.  मी मान्य करतो, मला थोडी भीती वाटत होती पण तशी तर प्रत्येक आईवडिलांना त्यांच्या मुलामुलींची काळजी वाटते. मला अजिबात माहित नव्हते की माझ्या ह्या चिंतेचे रूपांतर एक दिवस नेहमीच्या भीतीमध्ये होणार आहे.  

जेव्हा झहान ४ वर्षांचा होता तेव्हा एक दिवस तो घरी आला तेव्हा त्याला खूप धाप लागली होती. तो जिन्यातून धावत आल्यामुळे त्याला दम लागला असेल असे आम्हाला वाटले त्यामुळे आम्ही त्याचा फार विचार केला नाही.  त्याचा श्वास जेव्हा नेहमीसारखा सामन्य झाला नाही तेव्हा आमच्या इतकेच लक्षात आले की काही तरी समस्या आहे. आम्ही खूप घाबरलो आणि आमच्या हातात तेव्हा फक्त एकच गोष्ट होती जी आम्ही केली. आम्ही त्याला तात्काळ हॉस्पिटल मध्ये नेले.

आम्ही डॉक्टरांना काही सांगण्यापुर्वी, झहानला आयसीयूत नेण्यात आले आणि त्याच्या नाकावर व तोंडावर ऑक्सिजनचा मास्क लावण्यात आला. आम्हाला तेव्हा किती भीती वाटली हे शब्दात सांगता येणार नाही. आमच्या हातून तो निसटणार असे आम्हाला वाटत होते.

काही तासांनी, डॉक्टरांनी आम्हाला माहिती दिली तेव्हा आमची चिंता कमी झाली आणि नवी भीती मनात निर्माण झाली.  आता झहानला धोका नव्हता. पण त्याला अस्थमा होता. आम्ही घाबरून गेलो आणि आम्हाला अस्थमाचे फारसे ज्ञान नव्हते, त्यामुळे आम्ही डॉक्टरांवर प्रश्नांचा भडीमार केला. ‘तो बरा होईल का?’ ‘त्यालाच का झाला?’ ‘त्याचा अस्थमा बरा करण्यासाठी काही उपचार आहेत का?’ ‘तो पुन्हा फुटबॉल खेळू शकेल का?’ ‘तो किती लहान आहे, मग त्याला अस्थमा का झाला?’

तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला अस्थमाविषयी सर्वकाही समजावून सांगितले आणि झहानसाठी इन्हेलर्स कसे उत्तम आहेत हे सांगितले.  इन्हेलर्सचा कसा फायदा होतो हे आम्हाला समजले नाही. आम्ही पुन्हा प्रश्न विचारण्यास सुरूवात केली- ‘त्याला इन्हेलर्सची का गरज आहे?’ ‘ते फक्त मोठ्या माणसांसाठी नसतात का?’ ‘हा उपचारांचा शेवटचा पर्याय नाही का?’ ‘इन्हेलर्समध्ये स्टेरॉईडस असतात ना?’ ‘ स्टेरॉईडसमुळे झहानची वाढ खुंटेल का?’

तेव्हा डॉक्टरांनी इन्हेलर्सबद्दल असलेले गैरसमज आणि इन्हेलर्समुळे वायूमार्ग कसे खुले होतात आणि लोकांना चांगल्या प्रकारे श्वास घेता येतो वगैरे माहिती सांगण्यास सुरूवात केली. आम्हाला तरी सुद्धा इन्हेलर्सबद्दल थोडा विश्वास नव्हता पण झहानला यामुळे फायदा होईल याची आमची खात्री झाली. आणि त्यामुळे इन्हेलर्सचा अचूक उपयोग कसा करायचा हे आम्ही शिकून घेतलके आणि झहानला ते शिकविले.

पण इन्हेलर्सचे उपचार घेत असताना देखील आम्ही त्याची काळजी घेत होतो. तो काय खातो आणि पितो त्या बारिक बारिक गोष्टींवर आम्ही लक्ष ठेवले. काहीही कामासाठी झहान बाहेर गेला तरी आम्हाला काळजी वाटत होती, आणि त्याने एखादा खेळ खेळणे याचा तर अजिबात प्रश्नच नव्हता. आम्हाला तो आमच्या जास्तीत जास्त जवळ असावा असे वाटत होते, त्यामुळे त्याला काहीही त्रास होणार नाही.

हळूहळू आम्हाला इन्हेलेशनच्या उपचारांचे परिणाम दिसू लागले. आम्हाला त्याच्या श्वासोच्छवासात सुधारणा होत असल्याचे दिसून आले आणि त्याचा आत्मविश्वास पुन्हा येऊ लागला. त्याचे ट्रायगर्स टाळणे आणि डॉक्टरांची नियमित भेट घेणे आणि त्याचबरोबर इन्हेलर्सचा योग्य प्रकारे उपयोग करणे  यामुळे झहानला त्याचा अस्थमा नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली.

आज तो १२ वर्षाचा आहे आणि झहान पुन्हा एकदा एक अॅक्टिव आणि निरोगी मुलगा बनला आहे. तो अतिशय उत्तम पोहोतो आणि फुटबॉल खेळतो. त्याला हवे ते तो खातो, आणि अगदी लहान वयातच तो एक उत्तम कुक बनला आहे. झहानकडे पाहणार्‍या कोणाचाही विश्वास बसणार नाही की झहानला अस्थमा आहे, आणि अगदी खरंच सांगायचे तर कधीकधी आमचा देखील विश्वास बसत नाही.

Please Select Your Preferred Language