गोपनियता धोरण

सिप्ला लिमिटेड द्वारा आपणास “www.breathefree.com" ही वेबसाईट पाहण्यापुर्वी किंवा तिचा आढावा घेण्यापुर्वी (येथून पुढे ‘‘वेबसाईट’’ असे संबोधण्यात येईल) हे गोपनियता धोरणाचे निवेदन काळजीपूर्वक वाचण्यास आणि त्याचा आढावा घेण्यास सांगण्यात  येत आहे. आपण ही वेबसाईट पाहण्यास किंवा तिचा उपयोग करण्यास सुरूवात केल्यास, आपण कोणत्याही अपवादाशिवाय ह्या गोपनियता धोरणाच्या निवेदनाचे बंधन पाळण्याचे मान्य करत आहात. आपणास हे गोपनियता धोरणाचे निवेदन मान्य नसल्यास आपण ही वेबसाईट पाहू नये किंवा तिचा उपयोग करू नये. सिप्ला लिमिटेड, त्यांच्या उफपन्या, त्यांचे संबंधी आणि त्यांच्या समुहातील कंपन्या (येथून पुढे ‘‘सिप्ला’’ असे संबोधण्यात येईल) कोणत्याही आगाऊ सूचनेशिवाय माहिती समाविष्ट करण्याचा, काढून टाकण्याचा किंवा त्यात फेरफार करण्याचा अधिकार राखून ठेव आहेत. 

व्यक्तिगत ओळख पटविणारी माहिती गोळा करणे

१. कोणतीही व्यक्तिगत ओळख पटविणारी माहिती गोळा करण्यासाठी आणि /किंवा ती स्वीकारण्यासाठी ही वेबसाईट डिझाईन करण्यात आलेली नाही.  तुम्ही ही वेबसाईट पाहिल्याखेरीज आणि /किंवा व्यक्तिगत ओळख पटविणारी माहिती दिल्याखेरीज सिप्ला तुमची व्यक्तिशः ओळख जाणून घेऊ शकणार नाही.

२. माहितीचे सक्रिय (अॅक्टिव) संकलनः ह्या वेबसाईटच्या डेटा फिल्डसवर तुम्ही भरलेली व्यक्तिगत माहिती सिप्ला द्वारा संकलित केली जाते. उदाहरणार्थ, तुम्ही वेगवेगळ्या विषयांसंबंधी माहिती मिळविण्यासाठी तुमचे नाव, पोस्टाचा पत्ता, ई-मेल पत्ता, आणि/किंवा इतर माहिती सादर करण्याची शक्यता आहे. तुमच्या गोपनियतेचे रक्षण करण्यासाठी, तुम्ही सिप्ला लिमिटेड यांना खास न मागितलेली माहिती देऊ नये. 

३. माहितीचे निष्क्रिय (पॅसिव) संकलनः तुम्ही सिप्लाच्या वेबसाईटला दिलेल्या भेटींची माहिती सिप्लाची वेबसाईट तुम्ही ती सादर न करता देखील गोळा करण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानांचा उपयोग करून ही माहिती गोळा केली जाऊ शकते, जसे कुकीज, इंटरनट टॅग्स, आणि वेब बेकन्स. वेबसाईट यापैकी काही माहिती जसे तुम्ही नुकतेच भेट दिलेल्या वेबसाईटचे यूआरएल, इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) अॅड्रेसेस, जीपीएस लोकेशनची माहिती, मोबाईल फोन सर्हिर्स प्रोव्हायडर, ऑपरेटिंग सिस्टमची माहिती, ब्राऊजरची आवृत्ती, तुमचा संगणक वगैरे माहिती गोळा करण्याची शक्यता आहे. पॅसिव माहिती गोळा करणार्‍या तंत्रज्ञानामुळे तुम्हाला वेबसाईटचा उपयोग करणे अधिक सोपे होऊ शकते ज्यामुळे सिप्लाला अधिक चांगली सेवा देता येईल, ग्राहकांच्या प्राधान्यानुसार साईट खास बनविता येईल, सांख्यिकी माहिती गोळा करता येईल, कलाचे विश्लेषण करता येईल, आणि अन्यथा वेबसाईटचे प्रशासन व सुधारणा करता येईल. ह्या तंत्रज्ञानाद्वारे गोळा करण्यात आलेल्या सदर माहितीचा अधिक ओळख पटविणार्‍या माहितीशिवाय तुमची ओळख पटविण्यासाठी उपयोग करता येणार नाही. 

व्यक्तिगत ओळख पटविणार्‍या माहितीचा नियोजित उपयोग

४. तुम्ही वेबसाईटद्वारा दिलेल्या व्यक्तिगत माहितीचा सिप्लाद्वारा तुमच्या प्रश्नांना प्रतिसाद देणे, कार्यक्षम संवाद साधणे आणि तुम्हाला अधिक कार्यक्षम ग्राहक सेवा देण्यासाठी उपयोग करण्यात येईल.  तुम्ही प्रपत्रात किंवा वेबसाईटवरील डेटा फिल्डमध्ये माहिती भरल्यानंतर, त्या वेबसाईटला तुम्ही वारंवार वेबसाईटच्या कोणत्या भागांना भेट देता, आणि तुम्ही तुमच्या युजर आयडीचा उपयोग करता का, यासारखे तुमचे व्यक्तिगत प्राधान्य ‘‘लक्षात’’ ठेवता यावे यासाठी, सिप्ला ठराविक ओळख पटविणार्‍या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची शक्यता आहे. 

५. सिप्लाद्वारा सर्व लागू कायद्यांची पूर्तता करून तुमची माहिती गोळा करणे, साठवून ठेवणे, आणि तिचा उपयोग करण्यात येईल. तुम्ही प्रपत्रात किंवा वेबसाईटच्या डेटा फिल्डसमध्ये कोणतीही व्यक्तिगत माहिती समाविष्ट न करून नेहमीच सिप्ला यांना मिळणार्‍या व्यक्तिगत माहितीचे प्रमाण आणि प्रकार  मर्यादित ठेवू शकता. तुम्ही आम्हाला योग्य व्यक्तिगत माहिती दिल्यासच आमच्या काही ऑनलाईन सेवा तुम्हाला देता येतील. वेबसाईटवरच्या इतर भागांमध्ये तुम्हाला आवडण्याची शक्यता असलेल्या ऑफर्स, प्रमोशन्स आणि अधिक सेवांसाठी तुम्हाला आमच्या संपर्काच्या यादीत सहभागी व्हायचे आहे की बाहेर पडायचे आहे हे विचारण्यात येईल. तुम्ही त्याचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतल्यास, आम्ही त्या माहितीचा विपणन प्रचारासाठी उपयोग करण्याची शक्यता आहे.  उदाहरणार्थ, लागू कायद्यांनुसार आणि तुमच्या संमतीने आम्ही तुम्हाला बातम्या आणि न्यूजलेटर्स, स्पेशल ऑफर्स, आणि प्रचारसाहित्य, पाठविण्यासाठी आणि तुम्हाला आवडण्याची शक्यता आहे अशी उत्पादने किंवा माहितीसाठी तुमच्याशी संफ साधण्यासाठी तुमच्या ई-मेल अॅड्रेसचा उपयोग करण्याची शक्यता आहे. 

स्पॅमिंग

६. सिप्लाद्वारा ‘‘स्पॅमिंगला’’ मदत केली जात नाही. स्पॅमिंग म्हणजे साधारणपणे व्यावसायिक स्वरूपाचे, अनावश्यक ई-मेलस, अशा व्यक्तीला मोठ्या प्रमाणात आणि वारंवार पाठविणे ज्याच्याशी पाठविणार्‍याचा पुर्वी कधीही संफ नव्हता किंवआ ज्याने सदर पत्रव्यवहार स्वीकारण्यास नकार दिला होता. त्याविरूद्ध, सिप्ला द्वारा आपल्या व्हिजिटर्सना त्यांनी व्यक्त केलेल्या स्वारस्याच्या क्षेत्रातील  ई-मेल्स ठराविक कालांतराने पाठविण्यात येतील परंतु तुम्हाला सदर सेवेतून बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात येईल. 

माहिती उघड न करणे

७. सिप्ला, सिप्ला द्वारा संयुक्य कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाणार्‍या कंपन्या, आणि सिप्लासाठी व्यवसायाचे कामकाज करण्यासाठी सिप्ला द्वारा कंत्राट करण्यात आलेल्या व्यक्ती व संस्था, वेबसाईटवरील व्यक्तिगत माहिती उपलब्ध करून घेण्याची शक्यता आहे. 

८. सिप्ला द्वारा तुमची व्यक्तिगत माहिती इतर कोणालाही विकण्यात किंवा भाड्याने देण्यात येणार नाही. 

९. सिप्ला द्वारा त्यांच्या वेबसाईटसाठी अधिक प्रक्रिया करण्यासाठी किंवा त्या संदर्भात आवश्यक असल्यास तिसर्‍या पक्षांना व्यक्तिगत माहिती दिली जाऊ शकते. अशा वेळी, देण्यात येणारी माहिती तिसर्‍या पक्षाबरोबरच्या गोपनियतेच्या करारानुसार आणि लागू कायद्यांनुसार, ज्यासाठी मूळ हेतूसाठी माहिती गोळा करण्यात आली होती त्या नियोजित हेतूसाठी देण्यात येईल आणि सदर तिसरे पक्ष सिप्ला यांच्या गोपनियतेच्या धोरणाचे पालन करतील याची काळजी घेण्यात येईल.

१०. लागू  कायद्यांचे पालन करण्यासाठी आवश्यक आहे असे आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही तुमची व्यक्तिगत माहिती मुक्त (रिलिज) करू. जर कायद्यानुसार किंवा नियमांनुसार माहिती उघड करणे बंधनकारक आहे असे आम्हाला वाटल्यास, आम्ही व्यक्तिगत आरोग्याची माहिती उघड करण्याची शक्यता आहे. 

व्यक्तिगत माहितीचे संरक्षण

११. व्यक्तिगत ओळख पटविणारी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सिप्लाद्वारा पुरेशा तांत्रिक आणि संस्थात्मक सुरक्षा उपाययोजना करण्यात येतील.

१२. एक धोरण म्हणून, सिप्ला द्वारा व्यक्तिगत माहिती गोळा करणारे प्रत्येक वेब पेज सुरक्षित ठेवण्यात येत आहे, परंतु, इंटरनेटवर प्रसारित करण्यात आलेल्या व्यक्तिगत माहितीच्या गोपनियतेची खात्री देता येणार नाही.  इंटरनेटवरून व्यक्तिगत माहिती पाठविताना खबरदारी घेण्याची आम्ही आपल्याला विनंती करत आहोत. 

१३. सदर माहिती ज्यासाठी गोळा किंवा सादर करण्यात आली होती त्या नियोजित हेतूपेक्षा अधिक कालावधीसाठी तुमची माहिती साठवून ठेवणे सिप्ला वर बंधनकारक नाही. 

इतर वेबसाईटसना लिंक्स

१४. हे गोपनियता धोरण फक्त सिप्लाच्या वेबसाईटला लागू आहे. सिप्ला द्वारा तुम्हाला आवडणार्‍या असू शकता किंवा नसू शकतात असे आम्हाला वाटणार्‍या इतर वेबसाईटसना लिंक दिली जाण्याची शक्यता आहे. सदर वेबसाईटवरील माहिती, तुम्हाला सदर वेबसाईटच्या लिंक्सची उपलब्धता, तुम्ही दिलेल्या व्यक्तिगत माहितीची सुरक्षा किंवा त्या वेबसाईटने गोळा केलेली कोणतीही माहिती यासाठी सिप्ला जबाबदार नाही. सदर वेबसाईट उपलब्ध करून घेण्याशी संबंधित सर्व जोखमी पूर्णपणे तुमच्या आहेत. 

तुम्ही जेव्हा दुसर्‍या बाहेरील वेबसाईटच्या हायपरलिंकवर क्लिक करता तेव्हा तुम्ही त्या नवीन बाहेरील वेबसाईटच्या गोपनयिता धोरणाच्या अधीन असता. तुम्ही जेव्हा ह्या दुसर्‍या बाहेरील वेबसाईटवर ब्राऊज करता तेव्हा सिप्ला लिमिटेड, त्यांचे कोणीही संचालक, एजन्सीज, अधिकारी किंवा कर्मचारी ह्या बाहेरील वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोणत्याही माहितीची अचूकता, विश्वासार्हता, किंवा समयोचितता यांची खात्री देऊ शकत नाहीत किंवा ते लिंक केलेली कोणतीही माहिती, मते, उत्पादने, किंवा सेवा यांना पुष्टी देत नाहीत आणि तेथे देण्यात आलेल्या माहितीची अचूकता, विश्वासार्हता, किंवा समयोचितता ह्यावर विसंबण्यामुळे काही नुकसान झाल्यास त्यांना त्यासाठी जबाबदार धरता येणार नाही. 

मुलांद्वारा आमच्या वेबसाईटचा उपयोग

१५. सिप्ला हेतूपूर्वक मुलांकडून वेबसाईटवर कोणतीही व्यक्तिगत माहिती गोळा करत नाही किंवा तिचा उपयोग करत नाही (आम्ही अल्पवयीन १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांची ‘‘लहान मुले’’ अशी व्याख्या करतो). आम्ही हेतूपुरस्सर मुलांना आमच्याशी संवाद साधण्यास किंवा आमच्याशी संफ साधण्यास किंवा आमच्या ऑनलाईन सेवांचा उपयोग करण्यास भाग पाडत नाही. तुम्ही पालक असल्यास आणि तुमच्या मुलांनी आम्हाला माहिती दिली आहे असे तुम्हाला समजल्यास कृपया आमच्याशी संफ साधावा आणि ह्या समस्येवर उपाय करण्यासाठी आम्ही आपल्याला सहकार्य करू.

वेबसाईटवर तुमच्या व्यक्तिगत माहितीच्या ऊपलब्धतेचे अधिकार

१६. तुम्ही स्वत: वेसाईटवर दाखल केलेल्या व्यक्तिगत माहितीचा आढावा घेण्याची, बदल करण्याची आणि/किंवा ती काढून टाकण्याची तुमची इच्छा असल्यास, तुमच्या प्रोफाईलवर ‘‘एडिट’’ ह्या उपलब्ध असलेल्या पर्यायाचा वापर करुन तुम्ही तसे करु शकता. कोणतीही समस्या असल्यास, सदरसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करु शकता.

१७. तुम्ही आम्हाला दिलेल्या व्यक्तिगत माहितीचा उपयोग, सुधारणा,किंवा ती रद्द करणे ह्याविषयी तुम्हाला काही प्रश्न असल्यास, किंवा तुम्हाला सिप्लाच्या व्यवसायातून किंवा सिप्लाच्या एखाद्या ठराविक कार्यक्रमातून बाहेर पडायचे असल्यास, कृपया तुम्ही भेट देत असलेल्या वेबसाईटवरील ‘‘आमच्याशी संफ साधा’’ ह्या लिंकवर क्लिक करून आमच्याशी संफ साधा किंवा आम्हाला privacy@cipla.com येथे इ-मेल पाठवा. अन्यथा आपण आम्हाला येथे पत्र पाठवू शकताः

पत्ताः

प्रतीः लीगल डिपार्टमेन्ट

सिप्ला लिमिटेड, टॉवर ए, १ला मजला, पेनिन्सुला बिझनेस पार्क, 

गणपत राव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०० ०१३, भारत.

१८. सिप्ला यांना पाठविण्यात आलेल्या सर्व पत्रव्यवहारांमध्ये, कृपया नोंदणीसाठी वापरण्यात आलेला इ-मेल अॅड्रेस, (लागू असल्यास), वेबसाईट अॅड्रेस आणि तुमच्या विनंतीचे तपशिलवार स्पष्टिकरण यांचा समावेश करावा. तुम्हाला तुमची व्यक्तिगत माहिती काढून टाकायची (डिलिट) असल्यास किवा त्यात बदल करायचा असल्यास आणि आमच्याशी इ-मेल द्वारा संफ साधत असल्यास, कृपया इ-मेलच्या विषयाच्या ओळीवर ‘‘डिलिशन रिक्वेस्ट (काढून टाकण्यासाठी विनंती)’’ किंवा ‘‘अॅमेन्डमेन्ट रिक्वेस्ट (बदल करण्यासाठी) विनंती’’ असे नमूद करा. सर्व वाजवी विनंतीला वेळेत प्रतिसाद देण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.

धोरणातील बदल

१९. तंत्रज्ञानातील सुधारणा, कायदेशिर आणि नियामक बदल आणि उत्तम व्यवसाय पद्धतीचा अवलंब करण्यासाठी कोणतीही आगाऊ सूचना न देता ह्या गोपनियता धोरणात बदल करण्याचा अधिकार सिप्ला राखून ठेवत आहे.  सिप्लाद्वारा त्यांच्या गोपनियता कार्यपद्धतीत बदल करण्यात आल्यास, नवीन गोपनियता धोरणात सदर बदल समाविष्ट करण्यात येतील आणि सुधारित गोपनियता धोरणाच्या अंमलबजावणीची तारीख ह्या परिच्छेदात नमूद करण्यात येईल.

२०. ह्या गोपनियता धोरणात ह्यापुर्वी दिनांक १ ऑक्टोबर २०१७ रोजी सुधारणा करण्यात आली होती आणि त्या तारखेपासून ते अंमलात आहे. 

Please Select Your Preferred Language