ब्राँकायटिस

तुम्ही डॉक्टरांची केव्हा भेट घ्यावी?

जरी हे तीव्र किंवा जुनाट (क्रोनिक) असले तरी, ब्राँकॉयटिससाठी वैद्यकीय मदतीची गरज असते ज्यामुळे तुम्हाला योग्य उपचार मिळू शकतात. तुमच्या खोकल्याची लक्षणे खालील प्रमाणे आहेत असे तुम्हाला वाटत असल्यास, शक्य तितक्या लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
 तुमच्या खोकल्यातून रक्त किंवा जाड/गडद म्युकस (कफ) पडत असेल.
 तुमच्या तोंडाची चव खराब झाली असेल.
 त्यामुळे तुम्हाला नीट झोप लागत नसेल.
 तो ३ आठवड्यांपेक्षा अधिक काळ राहिला असेल.
 त्यामुळे छातीत दुखत असेल.
 त्यामुळे बोलताना त्रास होत असेल.
 त्याबरोबर श्वासाची घरघर असा आवाज येणे आणि/किंवा धाप लागणे यासारखी इतर लक्षणे असतील.
 त्यामुळे वजन कमी झाले असेल ज्याचे स्पष्टिकरण देता येत नसेल.

Please Select Your Preferred Language