सीओपीडी

सीओपीडीसह जीवन जगणे

सीओपीडीसाठी योग्य उपचार आणि व्यवस्थापनाची गरज आहे. तो नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी, तुम्हाला डॉक्टरांच्या सल्याचे काळजीपूर्वक पालन करावे लागेल.

सीओपीडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही आहाराची बंधने नाहीत, परंतु, तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी चौरस आहार घेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर, आरोग्याला पूरक आहार आणि नियमित व्यायामाद्वारे तुम्हाला सीओपीडीचा त्रास होण्याचे काही कारण नाही. 

पुनर्वसन कार्यक्रम

बहुतेक वेळा, सहज श्वास कसा घ्यावा, व्यायाम आणि चांगला आहार यासंबंधी समुपदेशनासह पल्मोनरी किंवा फुफ्फुसांच्या पुनर्वसनाच्या कार्यक्रमामुळे तुमच्या समस्येचे व्यवस्थापन करण्यास तुम्हाला मदत होऊ शकते.

तयार रहा

तुमच्यापाशी आणीबाणीच्या प्रसंगासाठी संपर्काची माहिती योग्य ठिकाणी असेल याची काळजी घ्या ज्यामुळे तुम्हाला ती सहज उपलब्ध होईल.  तुमचे आपत्कालीन क्रमांक, औषधे आणि डोसेस तुम्ही नेहमी ज्याठिकाणी जाता - उदा. रेफ्रिजरेटरपाशी आणि तुमच्या फोनपाशी ठेवा.

श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास, ताबडतोब तुमच्या डॉक्टरांकडे किंवा रूग्णालयात जा कारण ती आणीबाणी असू शकते.

ज्यांना समजते अशा व्यक्तींशी चर्चा केल्यास त्यामुळे मदत होऊ शकते - ब्रीदफ्री कम्युनिटीत सहभागी व्हा आणि ज्यांनी आपल्या श्वसनाच्या समस्यांवर मात केली आहे अशा हजारो लोकांशी चर्चा करा.

Please Select Your Preferred Language