पुढाकार

#SaveyourlungsDilli

जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक १३ प्रदुषित शहरे भारतात आहेत, ज्यात देशाची राजधानी नवी दिल्लीचा समावेश आहे. प्रदुषणाशी अधिक प्रमाणात संपर्क येण्यामुळे आपल्याला पर्यावरणाशी संबंधित अॅलर्जेन्सना आणि प्रदुषणकारी घटकांना तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे  दिल्लीतील जवळपास ३४% जनतेला अस्थमा, सीओपीडी आणि ब्राँकॉयटिस यासारख्या वेगवेगळ्या श्वसनाच्या समस्या आहे हे सांगितले तर आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. ह्या समस्या असलेल्या लोकांची संख्या इतकी मोठी असली तरी सुद्धा अॅलर्जेन्स आणि प्रदुषणकारी घटक फुफ्फुसांवर कशा प्रकारे परिणाम करतात ह्याविषयी लोकांमध्ये जाणीवजागृती फार कमी आहे.

श्वसनाच्या विविध समस्यांच्या प्रकारांची आणि त्यावरील उपचारांची लोकांना माहिती होण्याची आणि जागरूक असण्याची वाढती गरज असल्याची जाणीव ब्रीदफ्रीला (सिप्लाचा सार्वजनिक सेवा उपक्रम) आहे. म्हणून तुम्हाला सर्व माहिती मिळविण्यास मदत व्हावी आणि तुम्हाला गरज असलेले पाठबळ मिळावे यासाठी आम्ही ‘#Saveyourlungsdilli’ ही मोहीम सुरू केली. ह्या चळवळीबरोबरच ब्रीदफ्री द्वारा अशा प्रकारची पहिली एकमेव हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे, जी तुम्हाला चोवीस तास मोफत पाठबळ आणि माहिती पुरविते.

तुम्हाला श्वसनाची समस्या असेल किंवा तुम्हाला एखादी अशी व्यक्ती माहित असेल जिला श्वसनाची समस्या आहे किंवा तुम्हाला ती समस्या असू शकते असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हेल्पलाईनशी संपर्क साधू शकता आणि ब्रीदफ्रीला तुमच्या परिसरात मोफत फुफ्फुसांच्या तपासणीसाठी शिबीर आयोजित करण्यास सांगू शकता.

तेव्हा, ‘#Saveyourlungsdilli’ आणि मोकळा श्वास घेण्याची गरज आहे.

FB Live Interview with Dr. Jaideep Gogtay

Read More

ब्रीदफ्री फेस्टिवल

Read More

जागतिक अस्थमा महिना - २ मे, २०१७

Read More

Please Select Your Preferred Language