घरघर

व्हिजिंग (शिटी वाजणे) म्हणजे काय?

व्हिजिंग म्हणजे तुम्ही श्वास घेत असताना आपोआप शिटी वाजल्यासारखा आवाज येणे. हा आवाज साधारणपणे श्वास सोडताना ऐकू येतो, परंतु कधीकधी तुम्हाला श्वास आत घेताना देखील तो ऐकू येऊ शकतो. शिटी वाजणे हे ब्राँकॉयटिस, सीओपीडी किंवा अस्थमा यासारख्या श्वासाच्या समस्येचे निर्देशक असले तरी फुफ्फुसांमधील मोठे वायू मार्ग बंद होण्यामुळे किंवा स्वरयंत्रात काही समस्या असल्यास देखील तसा आवाज येऊ शकतो.

योग्य प्रकारच्या औषधांद्वारे व्हिजिंगवर सहज उपचार करता येतात. चिंता करण्याचे कारण नाही कारण आधुनिक औषधांमुळे बहुतेक श्वासोच्छवासाच्या समस्यांवर संपूर्ण नियंत्रण ठेवता येते आणि उपचार करता येतात.