इनहेलर

इन्हेलर्सचे प्रकार

संपूर्ण जगात अस्थमा आणि सीओपीडी सारख्या श्वसनाच्या अनेक समस्यांसाठी साधारणपणे इन्हेलर्सचा उपयोग करण्यास मान्यता आहे. इन्हेलर्समधून घेण्याच्या औषधांचे दोन प्रकार आहेत - नियंत्रक (जी तुमच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात) आणि आराम देणारी (रिलिवर्स) (जी झटका आल्यास अशा वेळी तात्काळ आराम देतात). श्वासावाटे घेतलेले औषध थेट फुफ्फुसांमध्ये पोहोचत असल्यामुळे अस्थमा आणि सीओपीडीवर उपचार करण्यासाठी इन्हेलर्स अतिशय सुरक्षित आणि सर्वाधिक प्रभावी पद्धती असल्याचे सिद्ध झाले आहे. 

साधारणपणे, इन्हेलर्स उपकरणांची ४ गटांमध्ये विभागणी करता येईल - प्रेशराईज्ड मीटर्ड डोस इन्हेलर्स (पीएमडीआयज), ड्राय पावडर इन्हेलर्स (डीपीआयज), ब्रीद अॅक्च्युएटेड इन्हेलर्स (बीएआयज) आणि नेब्युलायजर्स.

१) प्रेशराईज्ड मीटर्ड डोस इन्हेलर्स (पीएमडीआयज)

ह्याला पंप इन्हेलर्स असे देखील म्हणतात, हे सर्वाधिक सामायिकपणे वापरले जाणारे इन्हेलर उपकरण आहे. हे प्रॉपेलन्टवर आधारित असून ते फुफ्फुसांमध्ये एअरोसोल स्प्रेच्या स्वरूपात मोजमापकरून ठराविक प्रमाणात औषध सोडते व ते श्वासावाटे घ्यावे लागते. ते कार्यान्वित केल्यानंतर त्यातून दर वेळी पुन्हा डोस तयार करून मुक्त केला जातो. ही इन्हेलर्स औषध मुक्त करण्यास प्रेरित होण्यासाठी रूग्णाने श्वासाने ओढावे लागत नाही.  त्यासाठी कॅनिस्टर कार्यान्वित होणे आणि डोस श्वासावाटे घेणे यात समन्वय असण्याची गरज असते. साध्या शब्दात सांगायचे तर कॅनिस्टर दाबल्यानंतर आणि डोस सोडल्यानंतर अगदी त्याच वेळी तुम्ही डोस श्वासावाटे आत घेण्याची गरज असते. पीएमडीआयज ना डोस काउंटर देखील असतो त्यामुळे उपकरणात किती झुरके (पफ्स) शिल्लक राहिले आहेत ह्यावर लक्ष ठेवता येते.

लिंकः https://www.youtube.com/watch?v=qFXf7RUavMM

काही अशी उपकरणे आहेत ज्यांचा पीएमडीआयला, त्यांचा उपयोग करणे सोपे जावे म्हणून, अधिक (अॅड-ऑन) उपयोग करता येतो.

झिरोस्टॅट व्हीटी स्पेसर

ह्या उपकरणात पीएमडीआय कार्यान्वित केल्यानंतर थोडा वेळ औषध राखून ठेवले जाते. अशा प्रकारे, तुम्ही कॅनिस्टर कार्यान्वित करण्यासाठी दाबल्यानंतर अगदी  त्याच वेळी तुम्ही श्वासावाटे औषध अगदी त्याच वेळी घेतले नाहीत तरी स्पेसर तुम्हाला संपूर्ण औषध श्वासावाटे घेण्यास मदत करतो.

लिंकः https://www.youtube.com/watch?v=lOv0ODD6Vd4

बेबी मास्क   

तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला झिरोस्टॅट व्हीटी स्पेसर माऊथपिस नीट पकडता येत नसेल तर तुम्ही झिरोस्टॅट व्हीटी स्पेसर बेबी मास्क लावू शकता आणि त्यानंतर पीएमडीआयचा उपयोग करू शकता.

लिंकः https://www.youtube.com/watch?v=4y-PG500fFU

हफपफ किट

स्पेसर आणि बेबी मास्क हे अगोदरच हफपफ किट मध्ये अगोदरच बसवून येते. हे अगोदरच बसविलेले असल्यामुळे, आणीबाणीच्या प्रसंगी त्यामधून चटकन औषध देता येते आणि त्यामुळे वेळ वाचते. 

लिंकः  https://www.youtube.com/watch?v=emLVSoIwKmg

२) ड्राय पावडर इन्हेलर्स (डीपीआयज)

ह्या प्रकारच्या इन्हेलर्समधून कोरड्या पावडरच्या स्वरूपात औषध सोडले जाते.  डीपीआयज हे ब्रिद-अॅक्च्युएटेड उपकरण आहे, जे उपकरणातून औषध सोडण्यासाठी तुमच्या इन्हेलेशनवर (श्वासावाटे आत घेण्यावर) अवलंबून असते.  पीएमडीआयजच्या तुलनेत, यांचा उपयोग करणे सोपे असते कारण त्यासाठी प्रॉपेलन्टची आणि समन्वयाची गरज नसते. साधारणपणे डीपीआयज हे एका डोसचे उपकरण असते, तरी सुद्धा अनेक डोसची डीपीआयज देखील उपलब्ध आहेत.

रिव्होलायजर

रिव्होलायजर हे वापरण्यास सोपे डीपीआय आहे, ज्यांचा साधारणपणे वेगवेगळ्या रोटाकॅप्ससोबत उपयोग केला जातो. ह्यामधून औषधाचा अचूक डोस सोडला जातो आणि इन्हेलेशन फ्लोचा दर कमी असला तरी तो अधिक कार्यक्षम पद्धतीने वितरित केला जातो.

लिंकः https://www.youtube.com/watch?v=7WYrSinFtgY

रोटाहेलर

पूर्णपणे पारदर्शक असलेल्या रोटाहेलर्समुळे तुम्ही संपूर्ण डोस घेतला आहे याची तुम्ही खात्री करून घेऊ शकता.

लिंकः https://www.youtube.com/watch?v=mDXwrPCRl_M

३) ब्रीद अॅक्य्चुएटेड इन्हेलर्स (बीएआयज)

पीएमडीआय तंत्रज्ञानचा अत्याधुनिक आविष्कार असलेल्या ब्रीद अॅक्च्युएटेड इन्हेलरमध्ये पीएमडीआय आणि डीपीआयचे फायदे समाविष्ट असतात. अॅक्च्युएटरद्वारा बीएआयला तुमच्या इन्हेलेशनची जाणीव होते आणि आपोआप औषध सोडले जाते.

ऑटोहेलर

ऑटोहेलर  हा पीएमडीआय पेक्षा आणि काही डीपीआयज पेक्षा वापरण्यास खूप सोपा असतो. कोणीही व्यक्ती - लहान मुले, प्रौढ व्यक्ती आणि वयस्क व्यक्ती देखील त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतात.

लिंकः https://www.youtube.com/watch?v=P0oD2VOaLVY

४) नेब्युलायजर्स

पीएमडीआय आणि डीपीआय पेक्षा अगदी विरूद्ध, नेब्युलायजर्स द्रवरूप औषधाचे योग्य हवेत उडणार्‍या थेंबांमध्ये रूपांतर करतो. नेब्युलायजरसाठी समन्वयाची गरज नसते आणि ते फवार्‍याच्या रूपात औषध फुफ्फुसंमध्ये चटकन आणि प्रभावी पद्धतीने सोडते.  तान्ही बालके, लहान मुले, प्रौढ व्यक्ती, गंभीर, बेशुद्ध व्यक्ती, आणि ज्यांना पीएमडीआय आणि डीपीआयचा प्रभावी पद्धतीने उपयोग करता येत नाही अशा व्यक्तींसाठी अस्थमाचा झटका आल्यास अशा वेळी नेब्युलायजर्स योग्य असतात.

लिंकः https://www.youtube.com/watch?v=OrsIbHWxVlQ

Please Select Your Preferred Language