इनहेलर

इन्हेलर्स चांगले का असतात?

संपूर्ण जगात, अस्थमा आणि सीओपीडी, यासारख्या श्वसनाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणून सिरप्स आणि गोळ्यांऐवजी इन्हेलर्सचा स्वीकार केला जातो.

इन्हेलर्समुळे, औषधोपचार थेट फुफ्फुसांमधील वायूमार्गात, अगदी जेथे त्याचे काम असते त्याठिकाणी, काही सेकंदात पोहोचतात आणि आराम प्रदान करतात. दुसरीकडे, गोळ्या आणि सिरप्स घ्याव्या लागतात, ज्याचा अर्थ त्या पोटात पोहोचतात आणि प्रथम रक्तप्रवाहात आणि त्यानंतर फुफ्फुसात पोहोचतात. अशा प्रकारे, ते जलद आराम देत नाहीत.

त्याशिवाय, इन्हेलरचे औषधोपचार थेट समस्या असलेल्या ठिकाणी पोहोचत असल्यामुळे गोळ्या आणि सिरप्सच्या तुलनेत घ्याव्या लागणाऱ्या डोसचे लक्षणीय प्रमाण देखील कमी असते. 

अनेक लोकांना वाटते त्याअगदी विरूद्ध, इन्हेलर्सचे फार कमी दुष्परिणाम असतात, कारण औषधोपचार फार अल्प प्रमाणात शरीरात प्रवेश करते.

त्यामुळे, तुम्ही किंवा तुमच्या अपत्याने चिंता न करता इन्हेलर्सचा उपयोग करावा आणि तुम्हाला जे आवडते आणि ज्याचा आनंद मिळतो ते करणे सुरू ठेवू शकता.

Please Select Your Preferred Language