जागतिक अस्थमा महिना - २ मे, २०१७

जेव्हा एकंदरित आरोग्याचा प्रश्न असतो तेव्हा आपल्याला आपले शरीर एखाद्या चांगल्या प्रकारे वंगण केलेल्या मशिनसारखे चालावे असे वाटते. याचा अर्थ असा की आपले सर्व अवयव - हृदय, मेंदू, पोट आणि अगदी आपली फुफ्फुसे, हे देखील अगदी इष्टतम स्थितीत असले पाहिजेत. श्वासोच्छवास करण्याच्या आपल्या फुफ्फुसांची क्षमता आपण इतकी गृहित धरतो की आपल्याला श्वास घेण्यास त्रास झाल्याशिवाय आपण त्यांचा विचार देखील करत नाही. परंतु, फारशी लोकं फुफ्फुसांकडे लक्ष देत नाहीत आणि मग त्यांना जेव्हा श्वसनाच्या समस्या आहेत असे निदान करण्यात आले तर (आणि तेव्हा) त्यांना चिंता वाटते. अस्थमा आणि अॅलर्जी यासारख्या श्वसनाच्या समस्यांविषयी चिंता करण्याची गरज नाही. योग्य निदान आणि उपचार केल्यास, त्यावर अगदी सहजपणे उपचार करता येतो आणि त्याचे व्यवस्थापन करता येते.

श्वसनाच्या वेगवेगळ्या समस्या आणि उपचार यासंबंधी लोकांना माहिती देण्यासाठी ब्रीदफ्री, द्वारा (सिप्लाचा सार्वजनिक सेवा उपक्रम) जागतिक अस्थमा दिनाच्या निमित्ताने म्हणजेच २ मे, २०१७ रोजी संपूर्ण देशात शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. ह्या शिबिरांमुळे लोकांना स्पायरोमीटर्स आणि ब्रीद-ओ-मीटर्सचा वापर केल्याने त्यांच्या फुफ्फुसांच्या क्षमतेची चाचणी करण्यात मदत झाली आणि डॉक्टरांनी वेगवेगळ्या श्वसनाच्या मूलभूत समस्यांविषयी आणि त्यावर उपचार करण्याचा इन्हेलर्स हा प्रभावी मार्ग का आहे हे स्पष्ट करून सांगितले. डॉक्टरांनी इन्हेलर्स संदर्भात असलेले गैरसमज सांगितले आणि श्वसनाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी इन्हेलर्स हा सर्वाधिक प्रभावी मार्ग असल्याचे सिद्ध करणारी महत्त्वाची माहिती दिली.

शिबिराचा हा उपक्रम प्रचंड यशस्वी झाला आणि अनेक लोकांनी ह्या शिबिरांना भेट दिली व ब्रीदफ्रीला त्यांच्या विभागात अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करण्यासाठी विचारणा केली.