अस्थमा

अस्थमाचे निदान

अस्थमा आणि वारंवार होणारा खोकला यामध्ये संभ्रम होणे अगदी सहज शक्य आहे, कारण दोन्हींची लक्षणे सारखीच असतात. त्यामुळे प्रत्यक्ष समस्येवर चुकीचे उपचार केले जातात किंवा अजिबात उपचार केले जात नाही. परंतु, हे काही चिंतचे कारण नाही. कारण तुम्ही प्राथमिक टप्यातच अस्थमाचे निदान करू शकता.

वैद्यकीय इतिहास

तुमच्या डॉक्टरांना तुमची लक्षणे, औषधोपचार, अॅलर्जीज आणि आरोग्याशी संबंधित तुम्हाला असलेल्या इतर समस्या ह्यासंबंधी अचूक माहिती द्या. यामुळे तुमच्या डॉक्टरांना तुमच्या समस्येचे चटकन आणि अचूक निदान करत येईल.

कुटुंबाचा इतिहास

बहुतेक वेळा अस्थमा अनुवंशिक असतो. त्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या वैद्यकीय इतिहासाची माहिती असणे महत्त्वाचे आहे म्हणजे तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला ही समस्या होती का. यामुळे तुमच्या डॉक्टरांना तुमच्या तक्रारीचा थोडा अधिक सखोल अभ्यास करता येईल आणि तुमची अस्थमासाठी चाचणी करण्याची गरज आहे का हे निश्चित करता येईल.

शारीरिक तपासणी आणि चाचण्या

बहुतेक निदान हे वैद्यकीय इतिहासावर अवलंबून असल्यामुळे तुमचे डॉक्टर समस्या आणि कोणते उपचार द्यावेत ह्याची संपूर्ण खात्री करून घेण्यासाठी श्वासाची चाचणी करण्याची शिफारस देखील करण्याची शक्यता आहे.

पीक-फ्लो मीटर चाचणी

पीक-फ्लो मीटर हे लहान हातात धरण्याचे उपकरण असते जे तुमच्या फुफ्फुसातील ताकद निश्चित करण्यास मदत करते. तुम्हाला फक्त त्या उपकरणात फूक मारावी लागेल, आणि ते तुमची फुफ्फुसे किती सक्षम आहेत हे तुम्हाला दाखवेल.

स्पायरोमेट्री चाचणी

तुमच्या लक्षणांची माहिती करून घेतल्यानंतर आणि तपासण्या केल्यानंतर तुम्हाला अस्थमा आहे अशी डॉक्टरांना शंका आल्यास तुमच्या फुफ्फुसांची क्षमता निश्चित करण्यासाठी ते /त्या स्पायरोमेट्री चाचणी करतील. स्पायरोमीटर मध्ये तुमच्या फुफ्फुसांमध्ये किती हवा धरून ठेवण्याची क्षमता आहे आणि फुफ्फुसात किती चांगल्या प्रकारे हवा आत घेतली जाते आणि बाहेर सोडली जाते याचे मोजमाप केले जाते. हे परिणाम मूल्ये आणि आलेखाच्या स्वरूपात दिसतात.

दोन्ही चाचण्यांमुळे तुम्हाला अस्थमा असताना तुमच्या प्रगतीचे निदान करणे आणि त्यावर देखरेख ठेवण्यास मदत होते तरी ६ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी त्याची शिफारस केली जात नाही. त्यामुळे तुमच्या अपत्याच्या अस्थमाचे लवकर आणि अचूक निदान केले जावे यासाठी तुम्हाला बालरोगतज्ञाच्या सहकार्याने काम करावे लागेल. तुम्हाला बाळाच्या लहानपणापासून अस्थमावर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रायगर्स निश्चित करणे, लक्षणांवर लक्ष ठेवणे आणि बाळाच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी बारिक लक्ष द्यावे लागेल.