ब्राँकायटिस

विषयी

म्युकससह सतत येणारा खोकला (कफ) आणि श्वास घेण्यास त्रास होणे हे ब्राँकॉयटिसचे संकेत आहेत. जेव्हा फुफ्फुसातील वायूमार्ग, ज्याला ब्राँकियल नलिका म्हणतात त्यांना संसर्ग होतो किंवा क्षोभ होतो आणि सूज येते तेव्हा ही समस्या सुरू होते. यामुळे नलिकेतून हवा आत आणि बाहेर वाहताना त्रास होतो, त्यामुळे श्वास घेताना त्रास होतो. ब्राँकॉयटिस विषयी चिंता करण्याची गरज नसते आणि
योग्य निदान केल्यानंतर त्यावर संपूर्ण उपचार करता येतात. बॅक्टेरिया, विषाणू, क्षोभकारक गोष्टी, धूर आणि रसायने ही ब्राँकॉयटिसची
काही सामायिक कारणे आहेत.
‘अचूक निदान आणि उपचार यामुळे ब्राँकॉयटिस बरा होऊ शकतो’
व्यापकपणे, ब्राँकॉयटिसचे दोन प्रकार आहेत-
तीव्र (अॅक्यूट) ब्राँकॉयटिस- हा अधिक सामायिक असून तो विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो. इतर लक्षणांबरोबरच याच्या
काही लक्षणांमध्ये खोकला, ताप, घसा चुरचुरणे आणि श्वासाची घरघर असा आवाज येणे यांचा समावेश होतो. साधारणपणे हा काही
आठवडे राहतो, परंतु त्यामुळे नंतर साधारणपणे कोणत्याही समस्या होत नाहीत.
जुनाट (क्रोनिक) ब्राँकॉयटिस - हा तीव्र ब्राँकॉयटिसपेक्षा थोडा अधिक गंभीर आहे. ह्या प्रकारचा ब्राँकॉयटिस साधारणपणे पुन्हा पुन्हा
उद्भवतो किंवा दीर्घ काळ राहतो. ह्यामुळे सीओपीडीसारख्या फुफ्फुसांच्या इतर समस्या सूचित होतात. याची प्रमुख लक्षणे आहेत
खोकला आणि श्वासाच्या समस्या ज्या काही महिने किंवा वर्ष राहतात. धूम्रपान हे जुनाट ब्राँकॉयटिसचे सर्वाधिक सामायिक कारण
आहे. अचूक निदान आणि उपचारांमुळे ब्राँकॉयटिस बरा होऊ शकतो हे लक्षात ठेवणे ही महत्त्वाची गोष्ट आहे.