सीओपीडी

माहिती

क्रोनिकः दीर्घ कालावधीचा आणि न जाणारा 

ऑबस्ट्रक्टिव: फुफ्फुसातील वायूमार्ग अंशात्मक बंद होतो

पल्मोनरीः फुफ्फुसांसाठी वापरली जाणारी वैद्यकीय संज्ञा

डिसीजः आरोग्याची समस्या 

तज्ञांचे मत - ‘सीओपीडी कशामुळे जागृत (ट्रायगर) होतो? डॉ. मेहता सीओपीडी ट्रायगर्सबद्दल माहिती समजावून सांगत आहेत.

साध्या शब्दात सांगायचे तर सीओपीडी ही फुफ्फुसांची समस्या आहे ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्याची काळजी घेतली नाही तर कालांतराने त्याची स्थिती अधिक खराब होते. सीओपीडी भीतीदायक वाटते परंतु चिंता करू नका ते हाताळता येते. योग्य उपचार आणि औषधे घेतल्यास तुम्ही तुमचा सीओपीडी संपूर्ण नियंत्रणात ठेवू शकता आणि तुमच्या जीवनाच्या दर्जात सुधारणा करू शकता. अशा प्रकार, तुम्हाला आवडणार्‍या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता - गिरीभ्रमण ते नृत्यापासून ते प्रवास. सीओपीडी बद्दल अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी - हा संसर्गजन्य नसतो, त्यामुळे एखाद्या सीओपीडी असलेल्या व्यक्तीच्या सानिध्यात तुम्ही राहिलात म्हणून तुम्हाला तो होणार नाही.