प्रेरणा

आता स्वप्न देखील प्रकाशझोतात

जितेशला नेहमीच नृत्याची आवड होती. त्याचे पाय आपोआप एखाद्या यशस्वी कलाकारासारखे अचूक ठेका आणि ताल पकडत होते. त्यामुळे जेव्हा एक प्रोफेशनल डान्सर होण्याची त्याची इच्छा जेव्हा व्यक्त केली तव्हा आम्हाला देखील खूप आनंद झाला. त्याने त्याचे स्वप्न पूर्ण करावेआणि अधिक उंची गाठावी अशी आमची इच्छा होती.

एक दिवस त्याने क्लासला जाण्यास नकाल दिला तेव्हा काही तरी गडबड आहे असे आमच्या लक्षात आले. त्यानेत्याचा क्लास का चुकवला हे आम्हाला समजेना. पण त्याने आम्हाला त्याचे कारण सांगितले नाही, आणि फक्त तो म्हणत राहिला की त्याला आता येथून पुढे डान्स करण्याची इच्छा नाही.  शेवटी, खूप वेळा विचारल्यावर त्याने कारण सांगितले. तो क्लासला जात नव्हता कारण त्याला नेहमी डान्स करताना दम लागत होता.

तरी सुद्धा जितेशने त्याचे स्वप्न पूर्ण करावे असे आम्हाला वाटत होते म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो. तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला ती बातमी सांगितली की ज्यामुळे आमचे स्वप्न धाडकन कोसळले, कारण जितेशला अस्थमा होता.

सर्वप्रथम, आम्हाला विश्वासच बसला नाही. असे कसे होईल? त्याने काय केले? त्यालाच का? अनेक लोकांनी अनेक सल्ले दिले. वेगवेगळे उपचार सुचविले.  तो पुन्हा डान्सतर सोडाच पण पुर्वीसारखे चालता आणि धावता येईल का?

पण शेवटी, इन्हेलस आमच्या बचावासाठी आले. जितेशने त्याचे इन्हेलेशनचे उपचार सुरू केले आणि ज्यामुळे त्याचा अस्थमा उद्भवतो अशा गोष्टी काळजीपूर्वकपणे टाळण्यास सुरूवात केली. इन्हेलर्स, नियमित भेटी आणि डॉक्टरांकडे नियमित तपासण्या आणि जितेशची कठोर मेहनत यामुळे त्याचा अस्थमा पावलापावलाने हळूहळू नियंत्रणात आला.

आज, अगदी भरपूर डान्ससह जितेशला जे आवडते ते तो करतो. त्याला काही समस्या आहे हे कोणाला समजणार देखील नाही.  त्याच्या शाळेच्या वार्षिक संमेलनात देखील त्याने कार्यक्रम केला.

आता जणू काही जितेशला अस्थमा आहे हे आम्ही विसरलोच आहोत.