सीओपीडी

निदान

सीओपीडीसाठी कोणतीही खास एखादी चाचणी नसते. धूम्रपान  किंवा सतत इतर प्रकारचे फ्युम्स/धूर/क्षोभकारक घटक, लक्षणे, यांचा तपशिलवार इतिहास घेणे, शारीरिक तपासणी आणि स्पायरोमेट्री द्वारे फुफ्फुसांच्या कार्याची चाचणी याद्वारे प्राथमिक टप्यात असताना सीओपीडीचे निदान करणे शक्य असते.

तेव्हा, तुमची ही लक्षणे काही कालावधीत न गेल्यास, तुमच्या डॉक्टरांची भेट घेण्याची आणि समस्यांचे निदान करणे आणि त्यावर उपचार करण्याची ती योग्य वेळ असू शकते ज्यामुळे तुमच्या फुफ्फुसांना पोहोचलेली हानी पूर्ववत करण्यास तुम्ही मदत करू शकता.