उपयोगासंबंधी अटी

सिप्ला लिमिटेड यांच्या ब्रीदफ्री वेबसाईट ‘‘www.breathefree.com’’ (‘‘साईट’’) मध्ये आपले स्वागत आहे. ह्या उपयोगासंबंधी अटींमध्ये कोणाही व्यक्तीद्वारा (‘‘उपभोक्ता’’) ह्या साईटचा उपयोग किंवा ती उपलब्ध करून घेण्यासाठी असलेले नियम अटी (‘‘नियम अटी’’) निश्चित करण्यात आल्या आहेत. सिप्ला लिमिटेड कोणत्याही वेळी कोणत्याही आगाऊ सूचनेशिवाय ह्या नियम अटींमध्ये बदल करण्याची किंवा साईट खंडित करण्याची शक्यता आहे. नियम अटींचा कोणताही संदर्भ म्हणजे बदल केलेल्या किंवा सुधारत नियम अटींचा संदर्भ असेल. साईट आणि त्यातील माहितीचे भारतातील नियम कायद्यांची पूर्तता करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. जगाच्या इतर भागांमध्ये जरी उपलब्ध असली तरीही साईट आणि त्यातील माहिती फक्त भारतातील रहिवाशांसाठी उपलब्ध करून घेण्यासाठी आणि उपयोग करण्यासाठी आहे.

डॉक्टर आणि रूग्णांचा संबंध प्रस्थापित करणे हा ह्यासाईटचा उद्देश नाही. सिप्ला लिमिटेड (ज्या संज्ञेमध्ये त्यांचे संबंधी, उत्तराधिकारी आणि परवानगीप्राप्त नियुक्त व्यक्ती यांचा समावेश आहे) हे कोणत्याही औषधाच्या /उपचारांच्या प्रिस्क्रिप्शनची कोणतीही जबाबदारी घेत नाहीत किंवा त्याची खात्री देत नाहीत. ह्या साईटवर ज्यांची नावे प्रदर्शित करण्यात आली आहेत असे आरोग्यसेवा व्यावसायिक हे स्वतंत्र आणि खाजगी प्रॅक्टिस करणारे आहेत आणि ते सिप्ला लिमिटेडचे कर्मचारी किंवा एजन्टस नाहीत.सिप्ला लिमिटेड ह्या आरोग्यसेवा व्यावसायिकांची शैक्षणिक पात्रता किंवा खरेपणाची किंवा त्यांनी दिलेल्या वैद्यकीय सल्याच्या अचूकपणाची कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाहीत. ह्यासाईटवर कोणाही आरोग्यसेवा व्यावसायिकांचे नाव, पत्ता, माहिती, साहित्य ह्या सबंधी माहिती असल्यास त्याचा अर्थ सिप्ला लिमिटेडची कोणतीही मान्यता, किंवा शिफारस किंवा सल्ला असा होत नाही आणि वापरकर्ता व्यक्तीला माहितीचा खरेपणा आणि विश्वासार्हता यांची खात्री करून घ्यावी लागेल.

. नियम अटी स्वीकारणेः ही साईट उपलब्ध करून घेणे आणि तिचा उपयोग करणे हे येथे देण्यात आलेल्या नियम अटींच्या आणि सर्व लागू कायद्यांच्या अधीन आहे. ही साईट उपलब्ध करून घेऊन आणि ती ब्राऊज केल्यास, वापरकर्ता व्यक्तीने येथे देण्यात आलेले नियम अटी वाचले आहेत, त्याला ते समजले आहेत आणि कोणत्याही मर्यादेशिवाय किंवा पात्रतेशिवाय त्यांचा स्वीकार केला आहे. वापरकर्ता व्यक्ती यांचा देखील स्वीकार करत आहे की, सिप्ला लिमिटेड बरोबरचा कोणताही करार, ह्या नियम अटींच्या विरूद्ध असल्यास, तो बाद असेल आणि तो अंमलात नसेल किंवा परिणामकारक नसेल. तुम्हाला नियम अटी मान्य नसल्यास, तुम्ही ही साईट उपलब्ध करून घेऊ नये किंवा त्याचा उपयोग करू नये. त्यामुळे, भारतात किंवा भारताबाहेर ही साईट उपलब्ध करून घेणारी किंवा तिचा वापरकर्ता कोणीही व्यक्ती किंवा सेवा पुरवठादार हे संपूर्णपणे त्यांच्या/तिच्या जोखमीवर तो करतील आणि त्याच्या/तिच्या क्षेत्रातील कायद्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी त्यांची असेल.

. माहितीचा उपयोग करणेः वापरकर्ता व्यक्ती माहितीचा फक्त संदर्भाच्या मदतीसाठी उपयोग करतील आणि सदर साहित्य व्यावसायिक मताचा उपयोग करण्यासाठी पर्याय म्हणून देण्यात आलेले नाही (किंवा त्यासाठी त्याचा उपयोग करू नये). माणसाकडून चूक होण्याची शक्यता असल्यामुळे किंवा वैद्यकीय विज्ञानात बदल होण्याची शक्यता असल्यामुळे वापरकर्ता व्यक्तीने स्वतंत्र स्त्रोतांद्वारे ह्यामाहितीची खात्री करून घ्यावी. वापरकर्ता व्यक्तीने मुक्तपणे साईट ब्राऊज करावी परंतु कोणताही मसुदा, ध्वनी, चित्रे, ऑडिओ आणि व्हिडिओ (एकत्रितपणे ‘‘माहिती’’) यासह ह्यासाईटवरील माहिती फक्त अव्यावसायिक उपयोगासाठी उपलब्ध करून घेऊ शकतात, डाऊनलोड करून घेऊ शकतात किंवा तिचा उपयोग करू शकतात. वापरकर्ता व्यक्तीने सिप्ला लिमिटेड यांच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही व्यावसायिक हेतूसाठी माहिती वितरित करणे, तिच्यात सुधारणा करणे, प्रसारित करणे, पुनरूपयोग करणे, पुन्हा पोस्ट करणे किंवा उपयोग करू नये. आपण हे गृहित धरावे की ह्या साईटवर तुम्ही पहात असलेल्या किंवा पाहत असलेल्या सर्व माहितीसाठी अन्यथा नमूद केले असल्याखेरीज, लागू कायद्यांनुसार कॉपीराईट घेण्यात आला आहे आणि ह्या नियम अटींमध्ये नमूद केल्याव्यतिरिक्त इतर प्रकारे त्याचा उपयोग करू नये. माहितीचा उपयोग केल्यास त्यामुळे कोणत्याही तिसर्या पक्षाच्या अधिकारांचे उल्लंघन होणार नाही याची सिप्ला लिमिटेड ह्याद्वारे कोणतीही खात्री देत नाही किंवा सादर करत नाही. ह्या साईटचा उपयोग केल्यास त्याद्वारे कोणत्याही माहितीचे किंवा सिप्ला लिमिटेडच्या कॉपीराईटसाठी कोणताही परवना किंवा कोणतेही अधिकार जात नाहीत. साईटवर प्रदर्शित करण्यात आलेले ट्रेडमार्कस, लोगोज, सव्र्हिस मार्कस (एकत्रितपणे ‘‘ट्रेडमार्कस’’) हे सिप्ला लिमिटेड यांचे नोंदणी करण्यात आलेले आणि नोंदणी केलेले ट्रेडमार्कस आहेत. ह्या साईटवरील कोणत्याही गोष्टीचा सिप्ला लिमिटेड यांच्या पूर्व लेखी मंजुरीशिवाय कोणतेही ट्रेडमार्कस किंवा माहितीचा यांचा उपयोग करण्याचा परवाना किंवा अधिकार असा अर्थ करू नये.

. ‘‘तुमचे प्रश्न, साधी उत्तरे’’ सेवेचा उपयोगः वापरकर्ता व्यक्ती ह्या सेवेतील तुमचे प्रश्न, साधी उत्तरे वैशिष्ट्य, कनेक्शन, कम्युनिटीज, ब्लॉग किंवा चर्चा सेवा (‘‘तुमचे प्रश्न, साधी उत्तरे’’ सेवा) यांचा उपयोग करत असताना, ‘‘तुमचे प्रश्न, साधी उत्तरे’’ सेवेद्वारा तुम्ही अपलोड, पोस्ट, प्रसारित, ईमेल किंवा अन्यथा वितरण केलेल्या सर्व कम्युनिकेशन्स, माहिती, डेटा, मसुदा, संगीत, ध्वनी, ग्राफिक्स संदेश आणि इतर साहित्य (‘‘कंटेन्ट’’) यासाठी वापरकर्ता व्यक्ती जबाबदार असेल. ‘‘तुमचे प्रश्न, साधी उत्तरे’’ सेवेद्वारा तुम्ही किंवा कोणाही इतर व्यक्तीने पोस्ट केलेल्या कोणत्याही माहितीसाठी सिप्ला लिमिटेड जबाबदार नाही आणि सदर माहितीची अचूकता, प्रामाणिकपणा किंवा गुणवत्ता यांची कोणतीही खात्री देत नाही. तुम्हाला हे माहित आहे की, ‘‘तुमचे प्रश्न, साधी उत्तरे’’ सेवेचा उपयोग करून तुमचा क्लेषदायक किंवा आक्षेपार्ह साहित्याशी संफ येण्याची शक्यता आहे. कोणत्याही माहितीसाठी किंवा ‘‘तुमचे प्रश्न, साधी उत्तरे’’ सेवेद्वारे अपलोड, पोस्ट, प्रसारित, ईमेल किंवा अन्यथा उपलब्ध करून देण्यात आलेल्या कोणत्याही माहितीचा उपयोग करण्यामुळे परिणामस्वरूपकाही नुकसान किंवा हानी झाल्यास त्यास सिप्ला लिमिटेड कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. तुम्हाला धमकी देण्यात आली आहे किंवा एखादी व्यक्ती धोक्यात आहे असे तुम्हाला वाटल्यास, तुम्ही ताबडतोब कायद्याची अंमलबजावणी करणार्या स्थानिक एजन्सीशी संफ साधावा. जेव्हा वापरकर्ता व्यक्ती ‘‘तुमचे प्रश्न, साधी उत्तरे’’ सेवेचा उपयोग करते तेव्हा ते असे करण्यास सहमत आहेत

) स्थानिक, राज्याचे, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करणे;

बी) इतरांच्या बौद्धिक मालमत्ता अधिकारांचे किंवा इतरांची गुप्तता किंवा प्रसिद्धी संबंधी अधिकारांचे उल्लंघन करणारी कोणतीही माहिती पोस्ट, अपलोड, ईमेल, प्रसारित किंवा अन्यथा वितरित करणे.

सी) बेकायदेशिर, नुकसानकारक, अश्लिल, बदनामीकारक, धमकी देणारे, छळ करणारे , अपमानास्पद, शिवीगाळ करणारे, द्वेष करणारे, किंवा कोणाही इतर व्यक्तीला किंवा संस्थेला अडचणीत टाकणारे कोणतेही साहित्य पोस्ट, अपलोड, ईमेल, प्रसारित किंवा अन्यथा वितरित करणे, जे अशा प्रकारे आहे हे पूर्णपणे आम्ही स्वतःच्या निर्णयाद्वारे ठरवू;

डी) कोणत्याही प्रकारे अल्पवयीन व्यक्तींना हानीकारक असेल;

) व्यवसायाच्या जाहिराती किंवा विनंती पोस्ट करणे;

एफ) ‘‘तुमचे प्रश्न, साधी उत्तरे’’ सेवेद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या कोणत्याही मूळ माहितीचे रूप बदलण्यासाठी हेडर्स यांची नक्कल करणे किंवा अन्यथा आयडेन्टिफायर्समध्ये फेरफार करणे.

जी) चेन लेटर्स, पिरॅमिड योजना, अनावश्यक किंवा अनधिकृत जाहिराती किंवा स्पॅम पोस्ट, अपलोड, ईमेल, प्रसारित किंवा अन्यथा वितरित करणे.

एच) एखादी व्यक्ती किंवा व्यवसाय असल्याची बतावणी करणे किंवा एखाद्या व्यक्तीचा छळ करणे;

आय) कोणत्याही कॉम्प्युटर सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरमध्ये अडथळा, विध्वंस किंवा उपयोगाच्या मर्यादा निर्माण करण्याच्या हेतूने डिझाईन करण्यात आलेले व्हायरसेस किंवा अन्यथा हानीकारक कॉम्प्युटर कोड पोस्ट, अपलोड, ईमेल, प्रसारित किंवा अन्यथा वितरित करणे.

जे) -मेल अॅड्रेसेस सह इतरांची माहिती तयार करणे किंवा अन्यथा गोळा करणे;

के) तुमच्या ओळखीचा इतर व्यक्तीला पोस्टिंग किंवा कॉमेन्टस पाहण्यासाठी उपयोग करण्याची इतर व्यक्ती किंवा संस्थेला परवानगी देणे;

एल) ‘‘तुमचे प्रश्न, साधी उत्तरे’’ सेवा किंवा ‘‘तुमचे प्रश्न, साधी उत्तरे’’ सेवेला जोडण्यात आलेले कॉम्प्युटर्स, नेटवर्कस किंवा अन्य हार्डवेअर यात हस्तक्षेपकरणे किंवा अडथळा निर्माण करणे किंवा ‘‘तुमचे प्रश्न, साधी उत्तरे’’ सेवेच्या कोणत्याही आवश्यकतांचा किंवा त्याला जोडलेल्या नेटवर्कच्या धोरणांचा अनादर करणे.

एम) कोणत्याही एखाद्या अशा कार्यात सहभागी होणे ज्यामुळे इतर व्यक्तीला ‘‘तुमचे प्रश्न, साधी उत्तरे’’ सेवेचा उपयोग करण्यास किंवा त्याचा आनंद घेण्यास प्रतिबंध किंवा विरोध केला जाईल किंवा ज्यामुळे आमच्या स्वतःच्या निर्णयानुसार, आम्हाला किंवा आमचे ग्राहक किंवा आमचे पुरवठादार यांना काही दायित्व किंवा नुकसान होत असेल.

एन) इतर वापरकर्ता व्यक्तींच्या गोपनियतेचा आदर करणे. यात दुसर्या व्यक्तीच्या पासवर्ड, फोन नंबर, पत्ता, इन्स्टन्ट मेसेंजर आयडी किंवा पत्ता किंवा इतर कोणतीही व्यक्तिगत ओळख उघड करणारी माहिती उघड करणे यांचा समावेश आहे.

) सदस्याचे नाव तयार करणे किंवा इतरांना लैंगिक बाबतीत उघड करणारे, कोणत्याही प्रकारे एकटे पाडणारे, धमकावणारे किंवा हानी पोहोचविणारे पोस्ट, मेसेजस, मसुदा किंवा छायाचित्रे यांची विनंती करणे किंवा पाठविणे, किंवा सिप्ला लिमिटेड यांना खालील पैकी कोणत्याही गोष्टी करण्यास भाग पडू शकते (परंतु तसे करणे बंधनकारक नसेल):

) पब्लिक चॅट रूममध्ये संभाषण रेकॉर्ड करणे किंवा प्रीस्क्रीन करणे;

) एखादा संवाद ह्या भागातील अटींची पूर्तता करणारा आहे अशा आरोपाची तपासणी करणे आणि आमच्या स्वतःच्या निर्णयानुसार तो मसुदा काढणे किंवा काढण्याची विनंती करणे;

) अपमानास्पद, आक्षेपार्ह, बेकायदेशीर किंवा विघटनकारी, किंवा अन्यथा ह्या वापराच्या अटींशी जुळणारा मसुदा काढून टाकणे;

) तुम्ही वापराच्या अटींचे उल्लंघन केले आहे असे आम्ही निश्चित केल्यानंतर तुमचे प्रश्न, साधी उत्तरे सेवा तुम्हाला किंवा सर्वांना होणारी उपलब्धता खंडित करणे; किंवा

) मसुदा एडिट करणे. वापरकर्ता व्यक्ती सदर माहितीची अचूकता, परिपूर्णता, किंवा उपयुक्तता यासह कोणत्याही माहितीचे मूल्यमापन करणे आणि त्याचा उपयोग करण्याशी निगडित सर्व जोखमी सोसणे यास सहमत आहे. वापरकर्ता व्यक्ती याचा स्वीकार करत आहे, संमती देत आहे आणि यास सहमत आहे की, ‘‘तुमचे प्रश्न, साधी उत्तरे’’ या सेवेच्या उपयोग करताना तुम्ही त्याच्या अटींचे तुम्ही उल्लंघन करण्यात केले आहे का हे निश्चित करण्यासाठी किंवा कोणतेही लागू कायदे, नियम, सरकारी विनंती किंवा कायदेशिर प्रक्रियेची पूर्तता करण्यासाठी सिप्ला लिमिटेड द्वारा त्याची तपासणी करण्यात येईल. वापरकर्ता व्यक्ती यास सहमत आहे आणि हे मान्य करत आहे की, तुमच्या माहितीसह ‘‘तुमचे प्रश्न, साधी उत्तरे’’ या सेवची प्रक्रिया आणि प्रसारण यात विविध नेटवर्कसवर आणि उपकरणांवर प्रसारण करणे आणि सदर प्रसारणासाठी आवश्यक असलेली सुधारणा करणे समाविष्ट असू शकते.

येथील माहितीचा वापरकर्ता व्यक्तीच्या क्षेत्रात प्रॅक्टिस करण्याचे अधिकार असलेल्या परवानाधारक हेल्थकेअर प्रॅक्टिशनरच्या वैद्यकीय सल्यासाठी पर्याय म्हणून उपयोग करू नये. वापरकर्ता व्यक्तीने ह्या साईटवर किंवा अन्यथा वर्णन करण्यात आलेली किंवा विहित करण्यात आलेली कोणतीही औषधे, पुरवणी डाएट किंवा उपचार यांच्या त्यांचे/तिचे फिजिशिअन यांचा प्रथम सल्ला घेतल्याशिवाय उपयोग करू नये किंवा घेण्यास सुरूवात करू नये.

. वैद्यकीय माहितीः ह्या साईटवरील कोणतीही उत्पादने किंवा वैद्यकीय उपकरणाशी (एकत्रितपणे ‘‘उत्पादने’’) यासंबंधी माहिती सिप्ला लिमिटेड द्वारा सर्वसाधारण हेतूसाठी फक्त देण्यात आली आहे. सर्व उत्पादने फक्त भारतात उपलब्ध आहेत आणि अर्हताप्राप्त डॉक्टर किंवा वैद्यकीय व्यावसायिक यांनी लिहून दिल्यास उपलब्ध आहेत. ही उत्पादने सर्व देशांमध्ये उपलब्ध नसू शकतात किंवा वेगळ्या ब्रँड नावाने, वेगळ्या क्षमतेत किंवा वेगळ्या निर्देशांसाठी उपलब्ध असू शकतात.

. व्हिडिओ अस्वीकारः ही माहिती इलेक्ट्राॅनिक प्रसिद्धी माध्यमे (व्हिडिओज, फिजिशिअनच्या आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या मुलाखती यासह) लेखांद्वारा प्रसिद्ध केली जाऊ शकते. अशा स्त्रोतांद्वारे प्रसारित करण्यात आलेली ही माहिती ती व्यक्त करणार्या व्यक्तींची व्यक्तिगत मते आहे,आणि सिप्ला लिमिटेड यांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रणात नाही. कोणत्याही इलेक्ट्राॅनिक माध्यमाद्वारे कोणतीही सदर माहिती समाविष्ट करण्यात आल्यास त्याचा अर्थ त्यात देण्यात आलेल्या माहितीला सिप्ला लिमिटेडद्वारा पुष्टी देण्यात आली आहे असा होत नाही.

. दायित्वाचा अस्वीकारः साईटवर समाविष्ट करण्यात आलेली किंवा उपलब्ध असलेली माहिती, सॉफ्टवेअर, उत्पादने आणि सेवांमध्ये अचुकतेचा अभाव किंवा टाइपिंगच्या चुका असू शकतात.सिप्ला लिमिटेड अशा कोणत्याही चुकांसाठी कोणतेही दायित्व किंवा जबाबदारीचा स्वीकार करत नाही आणि याद्वारे वर उल्लेखित माहितीच्या संबंधात विक्रीयोग्यता, फिटनेस, शीर्षक, पूर्णता आणि गैर-उल्लंघन यांची ध्वनित वारंटी आणि अटींसह सर्व वॉरन्टीज आणि अटींचा अस्वीकार करत आहे. ह्या कलमाच्या हेतूंसाठी, सिप्ला लिमिटेडच्या संदर्भामध्ये सिप्ला लिमिटेड यांचे सर्व संबंधी, संचालक, अधिकारी, कर्मचारी, कन्सल्टन्टस यांचा समावेश आहे. ह्या साईटवरील माहिती अचूक, पूर्ण किंवा अद्यायावत आहे याची सिप्ला लिमिटेड कोणतीही खात्री देऊ शकत नाही. ह्या साईटवरील सर्व माहिती ताजी ठेवण्याचा सिप्ला लिमिटेडद्वारा प्रयत्न करण्यात येणार असला तरी सुद्धा ह्या साईटचे मालक आणि योगदान देणार्या व्यक्ती ह्या साईटवर असलेली माहिती अचूक, पूर्ण किंवा अद्यायावत आहे याचा कोणताही दावा, वचन किंवा खात्री देऊ शकत नाहीत. प्रत्येक केसनुसार स्वतंत्रपणे सल्ला द्यावा लागत असल्यामुळे ह्या साईटवरील कोणत्याही माहितीचा सक्षम मेडिकल प्रॅक्टिशनरच्या सल्यासाठी पर्याय म्हणून उप योग करू नये. वापरकर्ता व्यक्तीने त्याचे /तिचे आरोग्य, कोणतीही वैद्यकीय समस्या/बाब यासंबंधी कोणताही प्रश्न असल्यास किंवा कोणताही उपचारांचा निर्णय घेण्यापुर्वी डॉक्टरांचा किंवा अर्हताप्राप्त आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्यावा.

. उपयोग करणार्या व्यक्तीची माहितीः वापरकर्ता व्यक्तीने इलेक्ट्राॅनिक मेलद्वारा किंवा अन्यथा कोण माहिती, प्रश्न, टिप्पणी, सूचना (‘‘वापरकर्ता व्यक्तीची माहिती’’) सह कोणतीही माहिती प्रसारित किंवा पोस्ट केल्यास ती अगोपनिय किंवा मालकीची नसलेली माहिती समजण्यात येईल आणि ती सिप्ला लिमिटेडची मालमत्ता समजण्यात येईल. सिप्ला लिमिटेड किंवा त्यांचे कोणीही सबंधी कोणत्याही कारणासाठी माहिती साठवून ठेवण्याची किंवा तिचा उपयोग करण्याची शक्यता आहे ज्यात ती पुन्हा उधृत करणे, उघड करणे, प्रसारित करणे, प्रसिद्ध करणे, प्रक्षेपित करणे किंवा पुन्हा पोस्टिंग करणे यांचा समावेश आहे परंतु त्यास तितकीच मर्यादा नाही ज्यासाठी वापरकर्ता व्यक्तीला कोणतीही भरपाई दिली जाणार नाही. वापरकर्ता व्यक्ती देखील स्पष्टपणे याचा स्वीकार करत आहे की, सिप्ला लिमिटेड किंवा त्यांचे संबंधी हे वापरकर्ता व्यक्तीच्या माहितीत समाविष्ट असलेल्या कोणत्याही कल्पना, प्रणाली, माहिती किंवा तंत्रज्ञान यांचा कोणत्याही कारणासाठी, ज्यात उत्पादनांचा विकास, उत्पादन आणि त्यांचे विपणन यांचा समावेश आहे परंतु त्यास तितकीच मर्यादा नाही, यांचा समावेश असलेल्या कारणांसाठी त्याचा उपयोग करण्याची शक्यता आहे परंतु त्यासाठी वापरकर्ता व्यक्तीला कोणतीही भरपाई दिली जाणार नाही. सिप्ला लिमिटेड यांच्या नियंत्रणात काही बदल झाल्यास सिप्ला लिमिटेड कोणत्याही नवीन पक्षकाराला वापरकर्ता व्यक्तीची माहिती हस्तांतरित करण्याचे अधिकार राखून ठेवत आहेत. वरील काहीही असले तरी सुद्धा, वापरकर्ता व्यक्तींना साईट मध्ये कोणतेही बदल करण्यास मनाई आहे किंवा ज्यामुळे फौजदारी गुन्हा असेल असे कृत्य केले जाण्याची किंवा तसे करण्यास प्रोत्साहन दिले शक्यता आहे, नागरी दायित्वात वाढ होऊ शकते किंवा अन्यथा कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होऊ शकते असे कोणतेही बेकायदेशिर, धमकी देणारे, बेअब्रू करणारे, बदनामीकारक,अश्लिल, लज्जास्पद, प्रोक्षोभक, अपवित्र साहित्य पोस्ट करण्यास मनाई आहे. सिप्ला लिमिटेड द्वारा कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करणार्या प्राधिकार्यांना सहकार्य करण्यात येईल किंवा सिप्ला लिमिटेड यांना सदर माहिती किंवा साहित्य पोस्ट करणार्या व्यक्तीची ओळख उघड करण्याची विनंती किंवा आदेश देण्यात आल्यास सदर न्यायालयाला सहकार्य करण्यात येईल. सिप्ला लिमिटेड यांना वापरकर्ता व्यक्तीच्या कोणत्याही कृत्यामुळे कोणताही दावा, मागणी किंवा हानी यापासून कोणतीही क्षती पोहोचू नये यासाठी वापरकर्ता व्यक्ती सिप्ला लिमिटेड, त्यांचे संबंधी, संचालक, कर्मचारी, कन्सल्टन्टस यांचा नुकसानीपासून बचाव करतील आणि कोणतीही हानी पोहोचू देणार नाही.

. लिंक्सः साईटवर तिसर्या पक्षांच्या वेबसाईटसच्या लिंक्स असू शकतात, ज्या वापरकर्त्याच्या सोयीसाठी देण्यात आल्या आहेत. हे साधन कोणताही व्यावसायिक सल्ला देत नाही किंवा कोणत्याही ठराविक उत्पादनाची शिफारस करत नाही. फिजिशिअन किंवा आरोग्यसेवा व्यावसायिक यांनी त्यांनी दिलेल्या माहितीसाठी त्यांच्या स्वतःच्या चिकित्सिय तारतम्याचा वापर करावा. वापरकर्ता त्यांच्या स्वतःच्या निर्णयानुसार त्याचा उपयोग करत आहेत. ह्या लिंक्स सिप्ला लिमिटेड यांच्या नियंत्रणात नाहीत, आणि कोणतीही लिंक समाविष्ट करणे म्हणजे सिप्ला लिमिटेड द्वारा त्या वेबसाईटची पुष्टी केली जात नाही. सिप्ला लिमिटेड किंवा त्यांचे संबंधी, संचालक, कर्मचारी, अधिकारी, कन्सल्टन्टस अशा तिसर्या पक्षांच्या वेबसाईटवर असलेल्या कोणत्याही माहितीसाठी कोणताही दावा करत नाहीत,आणि त्यासाठी जबाबदार नाहीत.

. अहस्तांतरणीयः वापरकर्त्याद्वारा सदर साईटस आणि संबंधित वेबसाईटस यांचा उपयोग करण्याचे अधिकार काटेकोरपणे अहस्तांतरणीय आहेत. महिती किंवा दस्तऐवज मिळविण्यासाठी वापरकर्त्या व्यक्तीला देण्यात आलेले कोणतेही पासवर्ड, अधिकार किंवा उपलब्धता हे अहस्तांतरणीय आहेत आणि ते पूर्णपणे सिप्ला लिमिटेड यांची मालमत्ता आहेत.

१०. सल्ला नाहीः ही साईट सर्वसाधारण माहिती देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ह्या साईटद्वारा सिप्ला लिमिटेड (किंवा त्यांचे कोणीही संबंधी) मध्ये कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही ऑफर देणे किंवा वैद्यकीय सल्ला देणे हा हेतू नाही किंवा त्याद्वारे उत्पादनांचा योग्य उपयोग करण्यासाठी कोणत्याही सूचना करण्यात येत नाहीत.

११. मर्यादित दायित्वः सिप्ला लिमिटेड द्वारा ह्या साईटवर येथे देण्यात आलेल्या माहितीची अचूकता, परिपूर्णता, व्यवहार्यता किंवा उल्लंघन करणारी नाही याची कोणतीही खात्री दिली जात नाही; आणि (बी) व्यापारक्षमतेसाठी निहित वॉरन्टीज किंवा अटी, ठराविक हेतूसाठी फिटनेस, आणि गैरउल्लंघन यासह सर्व स्पष्ट किंवा ध्वनित किंवा वैधानिक वॉरन्टीज किंवा अटी, यास स्पष्टपणे नकार देत आहेत. सदर माहिती विश्वासार्ह समजल्या जाणार्या स्त्रोतांद्वारे मिळविण्यात आली असली तरी सुद्धा सिप्ला लिमिटेड किंवा सिप्ला लिमिटेड यांना माहिती देणारे माहितीच्या अचूकतेची कोणतीही खात्री देत नाहीत. ह्या साईटचा उपयोग करणे हे वापरकर्त्याच्या जोखमीवर आहे. ही साईट किंवा अन्य कोणत्याही तिसर्या पक्षाच्या साईटची निर्मिती किंवा वापर करण्यामुळे किंवा त्यावर अवलंबून राहण्यामुळे किंवा कोणत्याही साईटवरील लिंक्समुळे किंवा साईटचा उपयोग करता येण्यामुळे, दृष्टीपथात असलेले किंवा नसलेले, किंवा वापरकर्त्याला संभाव्यतेबद्दल आगाऊ सूचना देण्यात आली असली किंवा नसली, अशा पत्यक्ष किंवा अपत्यक्ष, आनुषंगिक, परिणामी किंवा कोणत्याही दावे किंवा तोटे झाल्यास त्यासह कोणत्याही मर्यादेशिवाय कोणत्याही प्रकारची किंवा स्वरूपाची हानी झाल्यास त्यासाठी सिप्ला लिमिटेड, किंवा त्यांचे कोणीही संबंधी, संचालक, कर्मचारी, अधिकारी, कन्सल्टन्टस हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जबाबदार राहणार नाहीत. या मर्यादेत तुमच्या कॉम्प्युटर उपकरणाला कोणतीही हानी होणे किंवा तुमच्या कॉम्प्युटर उपकरणाला कोणत्याही व्हायरसेसमुळे हानी पोहोचणे यांचा समावेश आहे. साईटवर संवादात्मक स्वरूपात पोस्टिंग केले जात असल्यामुळे सिप्ला लिमिटेड यांना वापरकर्त्यांनी पोस्ट केलेल्या कोणत्याही साहित्याची कोणतीही जबाबदारी स्वीकारणे शक्य नाही. वापरकर्त्यांनी निर्माण केलेल्या कल्पना, सूचना, मते, टिप्पण्या आणि निरिक्षणे आणि कोणताही मसुदा, माहिती, छायाचित्रे, व्हिडिओ, संगीत, ध्वनी, चॅट, मेसेजस, फाईल्स किंवा वापरकर्त्यांनी दिलेले इतर साहित्य (‘‘वापरकर्त्यांची सादरिकरणे’’) यांना सिप्ला लिमिटेड द्वारा कोणतीही मान्यता देण्यात येत नाही आणि सिप्ला लिमिटेड द्वारा साईटवर पोस्ट करण्यात आलेल्या वापरकर्त्याच्या कोणत्याही सादरिकरणासाठी कोणताही भरवसा, अचूकता, किंवा गुणवत्तेची कोणतीही खत्री दिली जात नाही. वापरकर्त्याने सादर केलेल्या कोणत्याही माहितीची
अचूकता, परिपूर्णता, किंवा उपयुक्तता यावर अवलंबून राहण्यासह वापरकर्त्याच्या कोणत्याही सादरिकरणाचा उपयोग करण्याशी संबंधित कोणत्याही जोखमीचे वापरकर्ता मूल्यमापन करेल आणि त्याची जबाबदारी स्वीकारेल. साईटवर पोस्ट करण्यात आलेली वापरकर्त्यांच्या सादरिकरणांची संपूर्ण जबाबदारी ज्यांनी वापरकर्त्यांचे सादरिकरण मूळ पोस्ट केले त्या व्यक्तीची असेल, आणि वापरकर्त्याच्या सादरिकरणामुळे परिणामस्वरूपकाही हानी, नुकसान, दावा, कार्यवाही किंवा दायित्वासाठी त्यास वापरकर्ता जबाबदार असेल. वापरकर्ते संपूर्णपणे त्यांच्या स्वतःच्या वापरकर्त्याच्या सादरिकरणास जबाबदार असतील आणि ते पोस्ट किंवा प्रसिद्ध करण्यामुळे होणार्या परिणामांस जबाबदार असतील. संबंधित वापरकर्त्यांच्या सादरिकरणाचे सर्व मालकी अधिकार वापरकर्त्यापाशी असतील. परंतु, साईटवर वापरकर्ता सादरिकरण सादर करून, ह्याद्वारे सिप्ला लिमिटेड यांना आता ज्ञात असलेल्या किंवा येथून पुढे निर्माण होणार्या कोणत्याही प्रसिद्धी माध्यमात साईट आणि सिप्ला लिमिटेडच्या व्यवसायाच्या संदर्भात साईटवरील कामाचा भाग किंवा सर्व काम (आणि त्याद्वारे तयार करण्यात आलेले काम) यांचा प्रचार किंवा पुनर्वितरण करण्यासाठी कोणत्याही मर्यादेशिवाय त्यासह त्याचा वापर, पुनःउधृत, वितरण, करण्याचे शाश्वत, संपूर्ण जगात, संपूर्ण स्वरूपाचे, रॉयल्टी मुक्त, उपपरवाना देता येणारे, हस्तांतरणीय अधिकार आणि परवाना देत आहेत. वापरकर्त्याने मागे दिलेला परवाना, साईटवर वापरकर्त्याचे सादरिकरण काढून टाकल्यानंतर आपोआप रद्द होईल. वापरकर्त्याने वापरकर्त्याचे सादरिकरण साईटवर पोस्ट करण्याचा निर्णय घेतल्यास, वापरकर्ता दर्शवित आहे की, सदर वापरकर्त्याचे सादरिकरण हे लागू कायदे, सर्वसाधारण शिष्टाचाराच्या स्वीकारार्ह नियम आणि प्रमाणित वर्तनाचे पालन करणारे आहे. वापरकर्त्याने साईटचा वापर केल्यास, त्याद्वारे सिप्ला लिमिटेडशी संबंधित वापरकर्त्यांच्या कायदेशिर अधिकारांचे ते पालन करत आहेत असे दिसून येते. वापरकर्त्याला हे माहित आहे की, कोणत्याही वापरकर्त्याने केलेल्या सादरिकरणासाठी सिप्ला लिमिटेड कोणतीही गोपनियतेची खात्री देत नाही आणि खास करून सिप्ला लिमिटेड यांना ह्या संदर्भातील कोणत्याही जबाबदारीतून मुक्त करत आहे. सिप्ला लिमिटेड वापरकर्त्याच्या सादरिकरणाच्या कोणत्याही प्रकारच्या दायित्वाचा स्पष्टपणे अस्वीकार करत आहे. सिप्ला लिमिटेड कोणत्याही आगाऊ सूचनेशिवाय कोणतीही माहिती आणि वापरकर्त्याचे सादरिकरण काढून टाकण्याचे अधिकार राखून ठेव आहेत. सिप्ला लिमिटेड कोणत्याही आगाऊ सूचनेशिवाय आपल्या स्वतःच्या निर्णयानुसार वापरकर्त्याला साईटची असलेली उपलब्धता कोणत्याही वेळी रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवत आहे. सिप्ला लिमिटेड किंवा त्यांचे संचालक, कर्मचारी, किंवा त्यांचे एजन्टस, वैद्यकीय हलगर्जीपणामुळे निर्माण झालेली कोणतीही कायदेशीर कार्यवाही, किंवा सेवा पुरवठादाराचे व्यावसायिक गैरवर्तन किंवा गहाळ करणे/कृती यामुळे वापरकर्त्याला झालेले कोणतेही नुकसान, हानी, ईजा यासाठी जबाबदार /देणे लागत नाहीत. त्याचप्रमाणे, सेवा पुरवठादाराचे व्यावसायिक गैरवर्तन किंवा सेवा पुरवठादाराच्या व्यवसायावर नियंत्रण ठेवणार्या लागू कायद्यांचे उल्लंघन करण्यामुळे वापरकर्त्याने केलेल्या कोणत्याही दाव्यामुळे सेवा पुरवठादाराला कोणतेही नुकसान झाल्यास किंवा हानी पोहोचल्यास सिप्ला लिमिटेड किंवा त्यांचे संचालक, कर्मचारी किंवा एजन्टस जबाबदार /देणे लागत नाहीत. सिप्ला लिमिटेड यांचे दायित्व नसण्याशी संबंधित तरतूद, ह्या अटींची आणि कोणत्याही कारणास्तव त्याचा उपयोग करण्याची मुदत संपल्यानंतर किंवा खंडित झाल्यानंतर देखील कायम राहील. सिप्ला लिमिटेड साईटवरील माहितीची गुणवत्ता, उपलब्धता आणि अचूकता यासह माहितीचा उपयोग करण्याशी संबंधित कोणत्याही स्पष्ट किंवा ध्वनित वॉरन्टीजचा अस्वीकार करत आहे.

१२. कॉपीराईटसंबंधी सूचनाः ही साईट आणि त्यातील संपूर्ण माहिती कॉपीराईट संरक्षणाच्या अधीन आहे. सिप्ला लिमिटेड यांच्या स्पष्ट संमतीशिवाय या साईटवरील माहितीची कोणत्याही परिस्थितीत प्रत घेऊ नये. येथे स्पष्टपणे अधिकार दिल्याखेरीज, वापरकर्त्याने सिप्ला लिमिटेड यांच्या स्पष्ट संमतीशिवाय साईटवर असलेली कोणतीही माहिती, मसुदा, चित्रे, दस्तऐवज यांचे प्रदर्शन, डाऊनलोड, वितरण, पुनरूधृत, पुनप्रसिद्धी, करू नये किंवा प्रसारित करू नये.परंतु वापरकर्ता साईटच्या ‘‘डाऊनलोड’’ भागात असलेल्या नॉलेज डेटाबेसमधील कोणतीही माहिती डाऊनलोड करू शकतो जी युजरनेम पासवर्डचा उपयोग केल्यास उपलब्ध आहे. सदर डाऊनलोड भागातील सर्व माहितीची पोचपावती आणि श्रेय सिप्ला लिमिटेड यांना द्यावे. सदर अशा प्रकारे श्रेय दिल्याशिवाय साईटवरील कोणत्याही माहितीचा उपयोग करण्यास स्पष्टपणे मनाई आहे आणि ते बौद्धिक मालमत्तेच्या अधिकारांचे उल्लंघन आहे आणि त्यामुळे वापरकर्त्याला कॉपीराईटच्या उल्लंघनासाठी संभाव्य आर्थिक नुकसानी सह दिवाणी किंवा फौजदारी शासन केले जाऊ शकते. सिप्ला लिमिटेड यांची मालमत्ता नसलेली साईटवर असलेली कोणतीही माहिती, ट्रेडमार्कस, किंवा इतर साहित्य यांचे कॉपीराईट त्यांच्या संबंधित मालकांच्या स्वाधीन राहतील. सिप्ला सदर माहितीसाठी कोणत्याही मालकी किंवा जबाबदारीचा दावा करत नाहीत आणि तुम्ही अशा साहित्याचा उपयोग करण्यासाठी त्यांच्या मालकांची कायदेशिर संमती घ्यावी. वापरकर्त्याला कोणत्याही माहितीचा उपयोग करायचा असल्यास किंवा माहितीच्या कोणत्याही भागाचा दुसर्या वेबसाईटवर समावेश करायचा असल्यास त्यांनी सर्वप्रथम सिप्ला लिमिटेड यांची लेखी परवानगी घेतली पाहिजे. वापरकर्ता बेकायदेशिर, अश्लिल किंवा क्लेशदायक माहिती प्रसिद्ध किंवा प्रसारित करत असल्यास, वापरकर्त्याला सिप्ला लिमिटेडच्या साईटला लिंक देण्याची किंवा सदर लिंकमुळे सिप्ला लिमिटेड यांच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचत असल्यास अशा प्रकारे सिप्ला लिमिटेडच्या साईटला लिंक देण्याची परवानगी नाही.

१३. विविधः कोणत्याही योग्य क्षेत्रातील न्यायालयाने कोणतेही नियम अटींमधील तरतुदी बेकायदेशिर, अवैध किंवा निरर्थक असल्याचे गृहित धरल्यास, सदर नियम अटींमधील बाकीच्या तरतुदी कायम आणि परिणामकारक राहतील.

१४. नियंत्रक कायदाः ही साईट सिप्ला लिमिटेड द्वारा मुंबईत (भारत) तयार करण्यात आली असून तेथे नियंत्रित केली जात आहे त्यामुळे सदर नियम अटींच्या संदर्भात भारतातील कायदे लागू असतील आणि ते फक्त मुंबईतील न्यायालयांच्या अखत्यारित असतील. सिप्ला लिमिटेड कोणत्याही सूचनेशिवाय एकतर्फीपणे वेळोवेळी आवश्यक असेल त्यानुसार साईटचा उपयोग करण्या अटींमध्ये बदल करण्याचे अधिकार राखून ठेवत आहेत. वापरकर्त्यांना प्रत्येक वेळी ते साईटला भेट देतील तेव्हा नियमित ताज्या माहितीसाठी अटी वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे. सिप्ला लिमिटेड कोणतीही सूचना देता कोणत्याही कारणास्तव साईटवरील कोणतीही माहिती रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहेत.

Please Select Your Preferred Language