डिस्क्लेमर

श्वसनाच्या आजारांविषयी सर्वसाधारण माहिती देण्यासाठी www.breathefree.com ह्या वेबसाईटचे
(‘‘वेबसाईट’’) डिझाईन करण्यात आले आहे. येथील नियम व अटींचे ही वेबसाईट आणि माहिती,
बातम्या आणि मसुदा, ग्राफिक्स, चित्रे आणि वेबसाईटवर समाविष्ट असलेली इतर कोणतीही माहिती
(‘‘माहिती’’) यांच्या उपयोगावर नियंत्रण आहे. संभाव्य रूग्ण किंवा त्यांचे नातेवाईक/मित्र (‘‘उपयोग
करणारे’’) आणि वेबसाईटवर दिसणारे वैद्यकीय किंवा आरोग्यसेवा प्रॅक्टिशनर/रूग्णालये /निदानात्मक
केन्द्रे/क्लिनिक/केमिस्टची दुकाने (‘‘सेवा पुरवठादार’’) वगैरेंसह ह्या वेबसाईटला भेट देणाऱ्या कोणाही
व्यक्तींना हे नियम व अटी लागू असतील.
ह्या वेबसाईटवर देण्यात आलेला मसुदा हा फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे आणि त्याद्वारे
कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याची विनंती किंवा तरतूद केली जात नाही. येथील मसुद्याचा उपयोग
करणाऱ्या व्यक्तीच्या विभागात सराव करण्याचे अधिकार असलेल्या परवानाधारक आरोग्यसेवा
प्रॅक्टिशनरकडून वैद्यकीय सल्ला प्राप्त करण्यासाठी पर्याय म्हणून उपयोग करू नये. उपयोग
करणाऱ्या व्यक्तीने प्रथम त्याच्या/तिच्या फिजिशियनचा सल्ला घेतल्याशिवाय ह्या वेबसाईटवर वर्णन
केलेले किंवा अन्यथा प्रिस्क्राईब केलेले (लिहून दिलेले) कोणतेही औषधोपचार, पूरक आहार किंवा
उपचार घेऊ नयेत किंवा सुरू करू नयेत. ह्या साईटवर समाविष्ट असलेल्या माहितीवर अवलंबून
राहण्यासाठी सिप्लाद्वारा कोणाही व्यक्तीसाठी काहीही जबाबदारी स्वीकारली जाणार नाही आणि सदर
माहितीच्या संदर्भात कोणत्याही जबाबदारीचा अस्वीकार करण्यात येईल. परवानाधारक आरोग्यसेवा
प्रॅक्टिशनरचा वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही ह्या वेबसाईटवरील कोणत्याही माहितीच्या आधारे
कोणतीही कृती करू नये.
उपयोग करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या/तिच्या स्वतःच्या निर्णयासाठी ह्या वेबसाईटवरील मसुद्याचा
पर्याय म्हणून उपयोग करू देऊ नये, जीचा त्याने/तिने ह्या वेबसाईटवरील माहितीचे मूल्यमापन
करण्यासाठी उपयोग करावा. उपयोग करणारी व्यक्ती हे मान्य करत आहे की, वेबसाईटवरील सेवा
पुरवठादार वेबसाईटवर दिलेल्या वेळेवर उपलब्ध नसू शकतात किंवा त्यांचा ह्या वेबसाईटशी असलेला
संबंध खंडित होण्याची शक्यता आहे.
सेवा पुरवठादारांपाशी वैध परवाना(ने) आहे आणि सराव करण्यासाठी संबंधित वैधानिक प्राधिकाऱ्यांकडे
नोंदणी केलेली आहे ह्याची खात्री करणे ही त्याची/तिची/त्यांची पूर्णपणे जबाबदारी आहे आणि ते सर्व

लागू कायद्यांचे पालन करतील. ह्या अटीचे उल्लंघन केल्यास त्यासाठी संबंधित सेवा पुरवठादार
कायदेशीर कारवाईस किंवा त्यामुळे होणाऱ्या इतर परिणामांसाठी संपूर्णतः जबाबदार असेल.
ह्या वेबसाईटवर कोणत्याही चुका नसणे किंवा काही गाळले जाऊ नये याची खात्री करण्यासाठी योग्य
काळजी आणि खबरदारी घेतली असली तरी सुद्धा, ह्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या
कोणत्याही साहित्यावर किंवा माहितीवर आधारित केलेली कोणतीही कृतीसाठी, व्यक्त केलेले मत,
दिलेला किंवा स्वीकारलेला सल्ला, कोणतेही प्रत्यक्ष आनुषंगिक, विशेष किंवा परिणाम स्वरूप झालेले
नुकसान आणि हानी यासाठी सिप्ला लिमिटेड कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल.

Please Select Your Preferred Language